सामान्य ज्ञान परीक्षा स्पर्धा संपन्न.!

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव मध्ये दिला हेल्पिंग हँड्स मल्टीपर्पज सोसायटी ने सहभाग जिल्हा परिषद हायस्कूल मध्ये घेतली तालुकास्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा स्पर्धा..!

भद्रावती (ता.प्र.) - दिनांक 09/08/2022 रोजी स्वातंत्र्याच्या 75 आठवड्याच्या अमृत महोत्सव यामध्ये विविध ठिकाणी विविध प्रकारचे उपक्रम राबवत आहे.मागच्या कोरोना काळामध्ये मुलांना अभ्यासक्रमाकडे असलेला गोडवा कमी झाला हे सध्या दिसून येत आहे आणि मोबाईल मध्ये वेळ घालवण्यात मुलं खुश होते या सर्व गोष्टीवर आळा म्हणजे मुलांना पुस्तकाबद्दलची किंवा अभ्यासक्रमाबद्दल चे महत्त्व आणि वाचनाचा गोडवा वाढावा या दृष्टिकोनातून हेल्पिंग हँड्स मल्टीपर्पज सोसायटी या संस्थेने तालुकास्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धा या परीक्षेचे 09/08/2022 ला आयोजन केले होते.सदर स्पर्धेला उत्कृष्ट सहभाग लाभला गट 'अ' मध्ये इयत्ता 6 ते 10 चे विद्यार्थी होते जवळपास 300 स्पर्धकांनी सहभाग दिला व गट 'ब' मध्ये 11 ते खुला वर्ग होता यामध्ये 150 विद्यार्थ्यांनी सहभाग दिला. विशेष म्हणजे या स्पर्धेला पालकांनी व शिक्षक वृंद यांनी स्वतः मुलांना परीक्षेला पाठविण्यास प्रेरित केले. सदर परीक्षा सकाळी 10 ते 11 व दुपारी 12 ते 1 या दोन सत्रामध्ये पार पडली. यामध्ये हेल्पिंग हँड्स मल्टीपर्पज सोसायटीचे सर्व संस्था पदाधिकारी तसेच जिल्हा परिषद हायस्कूलचे प्रिन्सिपल उपस्थित होते. मुख्याध्यापक अरविंद चौधरी, मिलिंद वाघमारे, अजय मुसळे, उमेश अलोणे, सुरेश डाकरे, राहुल बिबटे, सोनल उमाटे, अजय घाडगे, परेश मैदमवार, रिता सहारे, स्नेहा दारूंडे, कृतांत सहारे, अंकित तोडे, प्रशांत सातपुते, अब्दुल शेख, मनोज पेटकर, तुषार दुर्गे, दीपक कावटे, राकेश चटपल्लिवार, रोहिणी पडवेकर, रतन पेटकर, सागर निरंजने, विकास दुर्योधन, स्वप्निल मत्ते, स्वप्नजा बांबोडे, आशिष मल्लेलवार, आकाश सिंग, देवानंद हिवरकर,व सर्व संस्था सदस्य उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard. ".