स्प्राऊट्स Exclusive
मुंबई (जगदीश काशिकर) - अभिनेता सैफ अली खान व व हृतिक रोशन यांचा विक्रम वेधा ( Vikram Vedha ) हा चित्रपट ३० सप्टेंबरला रिलीज होत आहे. हा चित्रपट अधिकृतपणे 'द लायन बुक' या कंपनीतर्फे प्रायोजित केला जात आहे. ही कंपनी भारतात बेकायदेशीरपणे ऑनलाईन बेटिंगचा गोरखधंदा चालवत आहे व यातून मिळालेली हजारो कोट्यवधी रुपयांची काळी माया बॉलिवूडमध्ये गुंतवत आहे, अशी खळबळजनक माहिती 'स्प्राऊट्स'च्या इन्वेस्टीगेशन टीमच्या हाती लागलेली आहे. या चित्रपटावर तात्काळ बंदी घालावयास हवी, अशी स्प्राऊट्सची ठाम भूमिका व मागणीही आहे. 'बन निडर, दिखा जिगर, खेल इधर' ( 'Ban Nidar, Dikha Jigar, Khel Idhar' ही या चित्रपटाची टॅगलाईन आहे. या टॅगलाईनमधून प्रेक्षकांना जुगार खेळण्यास प्रवृत्त केले जात आहे. द लायन बुक (The Lion Book ) ही बेकायदेशीर कंपनी आहे. या बुकी कंपनीचा मालक हा हितेश खुशलानी ( Hitesh Khushlani ) आहे. खुशलानी यांच्यावर मुंबईत बलात्काराचा गुन्हा दाखल झालेला होता. त्यानंतर तो भारतातून दुबईला पळून गेलेला आहे. खुशलानी यांचा अभिनेता साहिल खान हा भागीदार (द लायन बुकचा सह-संस्थापक ) आहे. अशी माहिती साहिल यांनी त्यांच्या Instagram वर असणाऱ्या बायोडेटामध्ये अभिमानाने नमूद केलेली आहे. आजमितीला साहिल खानसह संजय दत्त, सुनील शेट्टी, कपिल शर्मा, उर्वशी रौतेल Urvashi Rautela यांसारख्या शेकडो नटनट्या या The Lion Book या बेकायदेशीर कंपनीचे सोशल मीडियावरून उघडपणे प्रमोशन करतात. मात्र भारतातील मोदी सरकार, राज्य सरकार व पोलीस प्रशासन यांचे या कंपन्यांशी 'अर्थ'पूर्ण संबंध असल्यामुळे हे सर्व जण मूग गिळून शांत आहेत.