निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयाचे इको -प्रो चंद्रपूर सोबत सामंजस्य करार व सर्टिफिकेट कोर्स इन बायोडायव्हर्सिटी कंजरवेशन अँड मॅनेजमेंट चे उद्घाटन संपन्न..!
भद्रावती (ता.प्र.) - स्थानिक नीलकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालय व ईको -प्रो चंद्रपूर यांच्यासोबत नुकताच सामंजस्य करार करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती चे अध्यक्ष डॉ विवेक शिंदे, उद्घाटक इको -प्रो चंद्रपूरचे संस्थापक अध्यक्ष श्री बंडू धोतरे, डॉ. नथू वाढवे, श्री संदीप जीवने तसेच आयोजक प्राचार्य डॉ. एल एस लडके उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात भद्रावती शिक्षण संस्था भद्रावतीचे संस्थापक सचिव स्व. निळकंठराव शिंदे व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्याअर्पण करून झाली. सर्वप्रथम उपस्थित सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले व याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल एस लडके यांनी आपल्या प्रास्ताविकेतून इको-पो चंद्रपूर यांच्यासोबतच्या सामंजस्य करार व नव्याने सुरू होत असलेल्या सर्टिफिकेट कोर्स इन बायोडायव्हर्सिटी कंजर्वेशन अँड मॅनेजमेंट याबद्दल सविस्तर माहिती देत या प्रकारचा कोर्स हा सर्वप्रथम या महाविद्यालयात व विद्यापीठात सुरू होत आहे तसेच या कोर्स चे महत्व स्पष्ट केले. त्यानंतर इको- प्रो चंद्रपूरचे संस्थापक श्री बंडू धोतरे यांचे महाविद्यालयाच्या वतीने सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व इको-प्रो चंद्रपूर व महाविद्यालया सोबत सामंजस्य करारावर सह्या करून सामंजस्य करार करण्यात आला याप्रसंगी श्री बंडू धोतरे यांनी विद्यार्थ्यांना जैवविविधतेवर सखोल मार्गदर्शन करीत आपण पर्यावरणाला विसरत चाललो आहोत त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे व आज आपण परिणाम पाहत आहोत तसेच त्यांनी जैवविविधतेमधील सर्व घटक कसे महत्त्वाचे आहेत यावर विद्यार्थ्यांना सखोल असे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती चे अध्यक्ष डॉ. विवेक शिंदे यांनी अशा प्रकारचा कोर्स आपल्या महाविद्यालयात सुरू होत आहे व त्याचा सर्व विद्यार्थ्यांनी स्वतःसाठी व समाजासाठी फायदा करून घ्यावा असे आवाहन केले तसेच आपण जीवन जगत असताना पर्यावरणाविषयी जागृत असणे आवश्यक आहे व त्यासाठी वेळ देण्याची सर्वांना आवाहन केले या कार्यक्रमाचे संचालन या कोर्सचे समन्वयक प्रा डॉ. नरेंद्र हरणे तर आभार प्रदर्शन सह समन्वयक प्रा डॉ. नथू वाढवे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता साक्षी कडवे, कल्याणी लांबवडे, मानसी कांबळे, आफरीन शेख, पल्लवी घाटे, प्रणय आगबत्तंवार, मेहरा येरगुडे, साहिल टोंगे, प्राध्यापक शशिकांत शीत्रे, प्राध्यापक प्रवीण कुमार नासरे, प्राध्यापक संदीप प्रधान, श्री कुशाल मानकर, श्री शरद भावरकर तसेच सर्व शिक्षक व शिक्षक इतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले तसेच या कार्यक्रमाकरिता महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.