आयक्युएसी समन्वयक प्रा.मोहीत सावे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
भद्रावती (ता.प्र.) - स्थानिक विवेकानंद महाविद्यालयातील आय.क्यू.ए.सी. विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप कशी मिळवावी या विषयावर आधारित मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी आयक्युएसी चे समन्वयक प्रा. मोहित सावे यांनी हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेट लिमिटेड द्वारे देण्यात येणाऱ्या स्कॉलरशिप विषयी सविस्तर मार्गदर्शन उपस्थित विद्यार्थ्यांना केले. एचपीसीएल या कंपनीद्वारे समाजातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास वर्ग आणि दिव्यांग विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप दिली जाते. ही स्कॉलरशिप प्राप्त करण्यासाठी फार्म कशाप्रकारे भरायचा आणि कोणत्या प्रकारची कागदपत्रे जोडायची याचे विस्तृत मार्गदर्शन केले. यावेळी प्रा.सावे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांच्या विविध शंकाचे समाधान केले. यावेळी इंग्रजी विभागप्रमुख डॉ. गजानन खामनकर, डॉ.यशवंत घुमे उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ नामदेव उमाटे यांच्या मार्गदर्शनात झालेल्या या मार्गदर्शनाचा महाविद्यालयातील कला व वाणिज्य शाखेतील विद्यार्थी - विद्यार्थिनींनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. काही अडचणी आल्यास विद्यार्थ्यांनी आपल्याशी संपर्क साधावा असे आवाहनही त्यांनी केले.