भद्रावती (ता.प्र.) - यशवंतराव शिंदे उच्च माध्यमिक विद्यालय चिचोर्डी भद्रावती येथे चित्रकला ड्राइंग ग्रेड परीक्षा केंद्र संचालक सुहास कोल्हे यांच्या निरीक्षणात पार पडली.महाराष्ट्र राज्य चित्रकला परीक्षा मंडळा मार्फत घेण्यात येणारी चित्रकलेची एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षा भद्रावती येथील यशवंतराव शिंदे उच्च माध्यमिक विद्यालयात यशस्वीरित्या घेण्यात आली. या परीक्षेला तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थी प्रविष्ट झाले होतो. चित्रकलेच्या एलिमेंट्री परीक्षा साठी तालुक्यातील 116 विद्यार्थी बसले होते, तर इंटरमिजिएट परीक्षा करिता तालुक्यातून 56 विद्यार्थी बसलेले होते. चित्रकला परीक्षेचे सेंटर यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालय हे होते . केंद्र संचालक म्हणून सुहास कोल्हे यांनी जबाबदारी पार पाडली. या परीक्षेत त्यांना क्षितिज शिवरकर सर, आस्कर सर, विनोद ठमके सर,श्री सचिन बेरडे सर यांनी सहकार्य केले. विद्यार्थ्यांनी भय मुक्त वातावरणात परीक्षा दिली. प्राचार्य डॉ. जयंत वानखेडे यांच्या मार्गदर्शनात ही परीक्षा यशस्वीरित्या संपन्न झाली.