संतापजनक - गुरुस्थानी असलेल्या मुनगंटीवार यांना शिष्य जोरगेवार यांनी अशी दिली गुरु दक्षिणा?

राजकारणात स्वतःला मोठं करण्याच्या क्रूर मानसिकतेत मोठ्यांचा असा होतो अनादर? काय आहे सत्य?

चंद्रपूर (वि.प्र.) : राजकारणं हा बदमाशांचा शेवटचा अड्डा असतो असं म्हटल्या जातं, पण त्यात काही लोकं खरोखर प्रामाणिक आणि जनतेच्या सेवेसाठी वाहून घेतलेले सेवाभावी पण असतात, त्यातच चंद्रपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार जे उच्चशिक्षित आहे व ते जनकल्याण हेच ध्येय घेऊन गोरगरीब जनतेचा आधार बनले असतांना पक्षांतर्गत कुरघोडीचे गलिच्छ राजकारणाचे ते बळी ठरले. त्यांना जाणीवपूर्वक मंत्री पद न देता बेदखल करण्यात आले, मात्र त्यांनी ज्यांना घडविले व ज्यांना राजकारणात आणले त्या शिष्य असणाऱ्या आमदार किशोर जोरगेवार यांनी खरेतर संकट अशा काळात त्यांचा आधार बनायला हवे होते, मात्र गुरुस्थानी असणाऱ्या मुनगंटीवारांना किशोर जोरगेवार यांनी ज्या पद्धतीने कन्नमवार जयंती प्रित्यर्थ आयोजित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमात दुय्यम स्थान देऊन अपमानित केले ते अत्यंत संतापजनक आहे, कारण ज्या मुनगंटीवारांच्या कर्तृत्वाने भाजप पक्ष जिल्ह्यात मोठा झाला व मंडप डेकोरेशन चे काम सांभाळणाऱ्या जोरगेवार सारख्या साधारण कार्यकर्त्याला त्यांनी मोठं केलं. त्या जोरगेवार यांनी आपल्या गुरुस्थानी असणाऱ्या मुनगंटीवारांना दुय्यम स्थान देऊन अपमानित करणे म्हणजे हिच कां गुरुदक्षिणा? असा प्रश्न राजकीय विश्लेषक आता विचारात आहे.
एक काळ होता की चंद्रपूर जिल्ह्यात भाजप म्हणजे सुधीर मुनगंटीवार असे समीकरण होते आणि त्यांच्याच बळावर भाजप मध्ये कार्यकर्त्यांची ताकत उभी राहिली, त्यात किशोर जोरगेवार हे विश्वासू कार्यकर्ते म्हणून मुनगंटीवार यांनी त्यांचेवर विश्वास केला आणि त्यांना भाजपाच्या कार्यक्रमाचे व इतर कार्यक्रमाचे मंडप डेकोरेशन चे काम दिले आणि त्यामुळेच मुनगंटीवार यांच्या मदतीने पैसे कमाविणारे जोरगेवार भाऊ भाऊ करून त्यांच्या मागे पुढे असायचे. दरम्यान सन 2009 च्या विधानसभा निवडणुकीत जोरगेवार यांना भाजपची उमेदवारी मिळावी म्हणून सुधीर मुनगंटीवार यांनी प्रयत्न केले, नव्हे अट्टाहास केला होता,की माझा विश्वासू कार्यकर्ता आमदार व्हावा पण त्यांचे प्रयत्न फसले,आणि नागपूर चे नाना शामकुळे हे भाजप उमेदवार ठरले व ते निवडून आले पण मुनगंटीवार यांनी आपले शिष्य असणाऱ्या जोरगेवार यांच्यासाठी  सन 2014 ला सुद्धा प्रयत्न केले पण तेव्हाही यश आले नाही. जोरगेवार शिवसेने कडून लढले आणि दुसऱ्या क्रमांकावर राहिले ते सुधीर मुनगंटीवार यांचे शिष्य होते म्हणून त्यांच्या समर्थकांनी आतून केलेल्या मदतीमुळे व नंतर 200 युनिट वीज फ्री देण्याच्या जुमल्यामूळे ते अपक्ष विजयी झाले. 2019 ची निवडणूक अपक्ष लढविली. कार्यकर्त्यांनीं नाना शामकुळे यांना बाहेरचा रस्ता दाखवत किशोर जोरगेवार यांना अपक्ष उमेदवार असतांना सुद्धा मतदारांनी हजारो रेकॉर्ड ब्रेक मतांनी निवडून दिले. पण हे केवळ भाजपाच्या कार्यकर्त्यांनी दिलेले अमूल्य असे योगदान होते हे कुणीही नाकारू शकत नाही, पण सत्तेचे पंख फुटले की हवेत उडण्याची मस्ती आपोआप संचारते अशी अवस्था किशोर जोरगेवार यांची झाली. आणि त्यांनी सन 2019 च्या विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर जणू आपणच या विधानसभा निवडणुकीत लोकप्रिय आमदार असण्याचा बनाव केला.
राज्यातील लोकसभा निवडणुकीनंतर बदललेली राजकीय स्थिती बघता व चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात जनतेला दिलेले 200 युनिट वीज बिल माफिची गॅरंटीचे आश्वासन न पाळल्यामुळे जनतेत आपल्याप्रती प्रचंड नाराजी असल्याने यावेळी आपण अपक्ष लढलो तर हरणार याची खात्री पटलेले जोरगेवार यांनी आणि सन 2024 च्या विधानसभा निवडणुकीत अगोदर कांग्रेस ची उमेदवारी मिळावी म्हणून पायपीट केली आणि नंतर भाजप च्या उमेदवारीसाठी पायघडया झिजविल्या आणि अगदी शेवटच्या क्षणी पक्षांतर्गत तडजोड होऊन भाजप चे उमेदवार ठरले आणि सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिक काम करून त्यांना निवडून दिले, पण ज्यांच्या आशीर्वादाने आपण कुठलेही राजकीय पाठबळ नसताना मोठं झालो आणि ज्यांच्या पाऊलवार पाऊल ठेऊन राजकीय यश मिळवलं त्या गुरुस्थानी  असणाऱ्या लोकनेत्याला जेंव्हा शिष्य आव्हान देतो व स्वतःच्या नेतृत्वात असलेल्या कार्यक्रमात दुय्यम स्थान देऊन अपमानित करतो तेंव्हा मात्र राजकारणं एवढं स्वार्थी आणि गुरु शिष्याच्या नात्याला कलंकित करणारं नतभ्रष्ट असतं याचा संताप सुज्ञ लोकांना पडतो, मात्र किशोर जोरगेवार यांचं स्वार्थी राजकारणं कार्यकर्त्यांच्या पचणी पडणार नाही त्याची किंमत त्यांना मोजावीचं लागेल  असा सूर आता उमटू लागला आहे.

फडणवीस व मुनगंटीवार यांच्यात काय वैर? :

खरं तर महाराष्ट्राच्या राजकारणात फोडाफोडीचे राजकारणं करून राजकारणाचं चिखल करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर राजकीय कार्यकर्ते संतापून आहे, पण सत्तेपुढे शहाणपण चालत नाही आणि पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या आशीर्वादाने सत्तेचे सूत्र त्यांच्याकडे असल्याने त्यांची भाजप मध्ये मानमानी सुरु आहे. सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिपद दिलं तर ते आपल्यापेक्षा भारी होईल व निधी स्वतःकडे जास्त नेईल या भावनेने कदाचित फडणवीस यांनी त्यांचा गेम केला असावा असा सूर सुद्धा ऐकू येत आहे. एकेकाळी सुधीर मुनगंटीवार भाजप चे प्रदेश अध्यक्ष असतांना देवेंद्र फडणवीस हे महासचिव होते आणि विदर्भ वेगळा व्हावा यासाठी विदर्भात त्याकाळी रथयात्रा निघाली होती, खरं तर मुनगंटीवार प्रदेश अध्यक्ष असताना महाराष्ट्रात भाजप चे संघटन वाढले आणि सतत 7 वेळा निवडून येण्याचा विक्रम पण त्यांनी केला, भाजप च्या आजच्या सर्व नेत्यामध्ये सर्वात जास्त शिकलेले व सभागृहात आपले संसदिय आयुध वापरून अनेक निर्णय घेण्यास शासनास भाग पाडणारे मुनगंटीवार यांना मंत्री पदापासून वंचित ठेवणे हे एक षडयंत्र आहे आणि ते कुणी केलंय याबद्दल सर्वांना ठाऊक आहे.पण राजकारणात ज्यांच्याकडे व्हिजन आहे त्यात सुधीर मुनगंटीवार हे सध्यातरी सर्वात पुढे आहे आणि चंद्रपूर जिल्ह्यात त्यांनी राबविलेले अनेक प्रोजेक्ट व प्रस्तावित प्रोजेक्ट हे बघितले तर राज्याच्या राजकारणात एवढा विकास पुरुष सध्यातरी कुठे दिसत नाही.हे तितकेच खरे.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.