बल्लारपुर (का.प्र.) - पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोल्याशी संलग्नित आनंद निकेतन कृषि महाविदयालय, आनंदवन, वरोरा येथील विदयार्थ्यांनी लसीकरण मोहिम राबवली. यामध्ये कृषिदुत शुभम कष्टी, तुषार गंधे, प्रीतम पाटील, वैभव वैरागडे, प्रतीक धोटे, आदित्य मांढरे यांचा समावेश होता. आनंद निकेतन कृषि महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. सुहास पोतदार, डॉ. रामचंद्र महाजन, कार्यक्रम प्रभारी डॉ एस.पंचभाई, कार्यक्रम समन्वयक डॉ. मुकुंद पाटोंड आणि डॉ.सुबोध गजलवार यांच्या मार्गदर्शनाखाली राबवीली. पशुसंवर्धन, आणि दुग्धशासना चे विषय तज्ञ सर घरोघरी जाऊन जनावरांच्या लसीकरणाबाबत जनजागृती केल्यामुळे जवळपास २६० जनावरांचे लसीकरण करण्यात मदत झाली.
या लसीकरणामध्ये लम्पी या रोगाची लस देण्यात आली आपणसर्व लम्पी या रोगाला जवळून बघितलेच आहे, हा रोग हवेच्या माध्यमातून याचा प्रादुर्भाव प्रसार होतो. आणि याचा प्रादुर्भाव वाढल्यावर याला नियंत्रणामध्ये आणणे जनू अशक्यच असते या रोगाची प्राण्यांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती तयार व्हावी यासाठी लंपी रोगाची लस दिली जाते. रोग नियंत्रणात आणण्यासाठी हा एक उत्तम उपाय आहे.
आनंद निकेतन कृषी महाविद्यालय, वरोरा तर्फे पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-२ टेमुर्डा अंतर्गत LSD Vaccination लसिकरण मौजा-मांगली (दे) या गावामध्ये जनावरांचे लम्पी रोगाचे लसीकरण व जंतनिर्मुलन व गोठ्यात गोचिड निमुर्लन असे उपक्रम घेण्यात आले. पशुवैद्यकीय डॉ. ममता व्हि. राठोड पशुधन पर्यवेक्षक व व्ही. एस. जाधव प. प. नगरी पशुधन पर्यवेक्षक उपस्थीत होते. डॉक्टर आणि विद्यार्थ्यांनी ही मोहीम गावभर राबविली आणि जनावरांना लस दिली ज्यानेकरून एकही पशू लसीकरणापासून वंचित राहू नये. विदयार्थ्याच्या माहितीनुसार ग्रामस्थ आणि पशुवैद्यकांच्या प्रतिसादामुळे हे सर्व शक्य झाले.