स्वामी विवेकानंद व मां जिजाऊ जयंती निमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन.!

निळकठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयात स्वामी विवेकानंद व मा जिजाऊ जयंती निमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन.!

भद्रावती (वि.प्र.) : स्थानिक - निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयातील विद्यार्थी विकास विभाग व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य प्रा डॉ अपर्णा धोटे, प्रमुख पाहुणे डॉक्टर शितल भडके, ग्रामीण रुग्णालय, भद्रावती, तेजश्री दुर्योधन, लॅब टेक्निशियन, ग्रामीण रुग्णालय, भद्रावती, डॉक्टर गजेंद्र बेदरे, प्राध्यापक कुलदीप भोंगळे व डॉक्टर किरण जुमडे उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊयांच्या प्रतिमेस माल्यार्पन करून तसेच पाहुण्यांच्या स्वागताने करण्यात आले.
सर्वप्रथम कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक कुलदीप भोंगळे यांनी केले त्यात त्यांनी स्वामी विवेकानंद जयंती व राजमाता जिजाऊ ची जयंती याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व याप्रसंगी आपण वकृत्व स्पर्धा का आयोजित केली याविषयी सांगितले.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर शितल भडके यांनी विद्यार्थ्यांना स्वामी विवेकानंदाच्या जीवनावर प्रकाश टाकला. स्वामी विवेकानंद एक थोर महात्मे होते व प्रभावी वक्ते होते, त्यांनी आपल्या वकृत्व शैलीने संपूर्ण जगाला जिंकले होते असे त्यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज केली.
याप्रसंगी आयोजित वकृत्व स्पर्धेत महाविद्यालयातील विद्यार्थिनी धनश्री नागोसे, ऐश्वर्या झिलपे, संखिशा हिवाळे, सुरज जीवतोडे व सृष्टी शर्मा यांनी सहभाग घेतला यांनी आपल्या वकृत्व शैलीतून मा जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या कार्याबद्दल व त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.मंचावर उपस्थित प्राध्यापक डॉक्टर गजेंद्र बेदरे यांनी विद्यार्थ्यांना स्वामी विवेकानंदांनी जगाला कसे जिंकले यावर मार्गदर्शन केले.याप्रसंगी ऐश्वर्या झिलपे हिचा प्रथम क्रमांक, धनश्री नागोसे द्वितीय क्रमांक, सुरज जीवतोडे तृतीय क्रमांक, सृष्टी शर्मा चतुर्थ क्रमांक व संखिशा हिवाळे यांनी पाचवा क्रमांक पटकाविला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य डॉक्टर अपर्णा धोटे यांनी आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना जीवनामध्ये जोखीम पत्करा, जिंकलो तर नेतृत्व कराल हरलो तर इतरांना मार्ग दाखवा असे सांगितले तसेच छत्रपती शिवरायांना ज्ञान, चरित्र, चातुर्य संघटन व पराक्रम अशा राजस्व गुणांची शिकवण जिजाऊंनी दिले तसेच प्रत्येक स्त्रीने आपल्या जीवनामध्ये मा जिजाऊ चा आदर्श ठेवला पाहिजे असे आवाहन केले.कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक सचिन श्रीरामे तर आभार प्रदर्शन प्राध्यापक डॉक्टर किरण जुमडे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वी करिता श्री तेलंग यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.