जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर येथे कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांची जयंती साजरी .!
बल्लारपुर (का.प्र.) : जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर या शाळेत दिनांक 10 जानेवारी 2024 रोजी महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बी. बी. भगत (मुख्याध्यापक), प्रमुख पाहुणे एम. डी. टोंगे (माजी मुख्याध्यापक), प्रमुख उपस्थिती आर. बी. अलाम आणि यु. के. रांगणकर यांची होती. प्रथमता: मंचावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांच्या फोटोला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
प्रमुख उपस्थिती यु. के. रांगणकर, आर. बी. अलाम, प्रमुख पाहुणे एम. डी. टोंगे (माजी मुख्याध्यापक) यांनी कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांच्या जीवनपटावर माहिती दिली. मुख्याध्यापक बी. बी. भगत यांनी अध्यक्षीय भाषणातून मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आर. के. वानखेडे, संचालन एस. एन. लोधे मॅडम, आभार प्रदर्शन एस. एम. चव्हाण यांनी केले. कार्यक्रमात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी चंदावार बाबू, जगदीश कांबळे, वामनराव बोबडे, इंद्रभान अडबाले, विद्यार्थीगण उपस्थित होते.