सुवर्ण हिरकणी पुरस्कारासाठी जर्नलिस्ट माधुरी कटकोजवार यांची निवड .!

पंढरपूरात होणार सन्मानित .!

बल्लारपुर (का.प्र.) :  चंद्रपूर येथील मास्टर ऑफ मास कम्युनिकेशन पदवी शिक्षण प्राप्त करून पत्रकारिता क्षेत्रात अल्पावधीत आपल्या कार्यकुशलतेमुळे मानाचे स्थान निर्माण केल्याबद्दल जर्नलिस्ट माधुरी दीपक कटकोजवार यांची "सुवर्ण हिरकणी पुरस्कारासाठी अखिल सोनार समाज प्रतिष्ठान अंबाजोगाई जिल्हा बीड, व सर्व शाखीय सोनार हक्क परिषद महाराष्ट्र राज्य यांचे संयुक्त विद्यमाने समितीचे संस्थापक अध्यक्ष श्री. सतीश उर्फ राजेश पंडित यांनी निवड केल्याचे जाहीर केले आहे. उपरोक्त भव्य सत्कार समारंभ श्रीक्षेत्र पंढरपूर येथील विठ्ठल रुख्मिणी परिसरातील नरहरी महाराज समाधी ट्रस्ट च्या सभागृहात दिनांक २८ मार्च २०२५ ला सकाळी ११वाजता आयोजित करण्यात आलेला आहे. चंद्रपूर संग्राम न्युज च्या त्या मुख्य संपादक असून या पुरस्काराबद्दल जर्नलिस्ट माधुरी कटकोजवार यांचेवर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे.



Post a Comment

Previous Post Next Post
clipboard. ".