मुस्कराकर, दर्द भुलाकर
रिश्तों में बंद थी दुनिया सारी
हर पग को रोशन करने वाली
वो शक्ति हैं एक नारी"।
जागनिमहिला दिनानिमित्त अनेक स्त्रीयांना गौरविल्या जाते. ज्यांनी आपल्या कार्यात उल्लेखनीय कार्य करून समाजाला प्रेरणा, सामर्थ्य देणाऱ्या स्त्रीया नेहमीच वंदनीय आहेत.
स्त्रीया ह्या नेहमीच आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ असतात. सहन शक्ती, मर्यादे पलीकडची तडजोड, नात्यांशी बांधिलकी, आणि सहावा सुप्त गुण ज्याला आपण सिक्स सेन्स म्हणतो. या सर्व गुणांची देणगी स्त्रियांना जन्मजातच असते. समाजात देवांपेक्षा देवीच अधिक पुजनीय असतात.
"उसका दामन है बड़ा
दिया उसने अपना प्यार सारा,
कहलाई वो स्त्री, कहलाई वो एक नारी
बनकर एक आदर्श उसने किया जग में उजियारा"।
गायत्री जामकर : अभियांत्रिकी पास करून पुणे TCS मध्ये नोकरी करत असलेली , आजच्या पिढीमध्ये आदर्श निर्माण करणारी, सर्वगुणसंपन्न असलेली एक गोड मुलगी. भविष्यकाळातील लग्नाची स्वप्न रंगवणारि, आपल्या प्रियकराशी एकनिष्ठ आणि निस्सीम प्रेम करणारी प्रियसी, घरातील मुलगा बनुन घरातील सर्व जबाबदाऱ्या पेलून आईवडिलांची आधार स्तंभ बनणारी आणि साखरपुडा झाल्यावर सासू सासऱ्यांना मुलगी बनून आलेल्या संकटाला धीर देवून,त्यावर मात करायचीच ह्या ठाम विश्वासावर त्यांना सांभाळून आपलसं करणारी आजची झाशीची राणी ,आधुनिक सावित्री.
वाचक,गायत्रीबद्धल सांगायच म्हणलं तर या कलयुगात सत्य,खर प्रेम करणारी प्रियसी आपल्याला तिच्यात पहायला मिळते.
प्रियकराचा साखरपुडा झाल्यावर त्याचा झालेला अपघात आणि त्या अपघातात झालेली मणक्याची जबर जखम, कमरेखालचा भाग संवेदनाहीन झाल्यावर आणि डॉ. नी कधी नीट होईल ह्याची शाश्वती नाही हे समजल्यावरही त्याला धीर देणारी त्याची साथ न सोडता त्याची संवेदना बनुन प्रत्येक क्षणाला त्याला सावरणारी, त्याची शक्ती बनून राहणारी हि गायत्री नक्कीच कौतुकास्पद आहे. आजही ती त्याची शक्ती बनून त्याच्यासोबत राहुन जगाला दाखवून दिले कि सच्चा प्यार आप भी जिंदा है।" या महिला दिना निमित्त अगदी तिच्या आणि तिच्या प्रियकराच्या जीवनासाठी शुभेच्छा .गायत्री वरून हे समजत की स्त्री हि किती कणखर आहे , मजबुत असते आणि सदैव वंदनीय आणि आताच्या मुलींना प्रेरणादायी आहे.
2) " मां है वो, बेटी है वो, बहन है वो,
तो कभी पत्नी है वो, जीवन के हर सुख-दुख में शामिल है वो,
शक्ति है वो, प्रेरणा है वो, नमन है उन सब नारियों को,
जीवन के हर मोड़ पर हमारा साथ देती हैं वो।"
सौ मीनल श्रीकर देशमुख (कहाळेकर) कहाळा ता. नायगाव या गावामध्ये राहुन सरपंच पद भुषविणारी एक धाडसी स्त्री.
सरपंच की पाहता पाहता आपल्या कुटुंबावर नितांत प्रेम करणारी, घरासोबत गावाचाही विकास करणारी आजची स्त्री.
जेंव्हा कोणतीही स्त्री समाजामध्ये काम करते तेंव्हा ती घरामध्ये तेवढी कर्तव्यनिष्ठ असते आणि याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे मीनल ताई.यशाच्या उच्च शिखरावर असुनही सरपंचपद सोडून देऊन संकटाच्या वेळी कुटुंबाला अधिक महत्व देणारी मीनल ताई समाजापुढे प्रेरणादायी आहेत.
त्यांच्या मिस्टरांना अचानक लिव्हरचा त्रास झाला आणि त्यांनी त्यांना पूणे येथे संचेतीला दाखवायचे ठरविले. लिव्हर दान हि गोष्ट आपल्यापैकी अनेकजणांनी पहिल्यांदाच वाचली असेल; पण जेंव्हा आपल्या मिस्टरांचे लिव्हर खराब झाल्याचे समजताच अगदी दुसऱ्या संकेंदाला त्यांनी स्वतःचे लिव्हर देवून त्यांना जीवनदान देण्याचे ठरविले आणि त्यांनी तसे केले हि.
आपल्या शरीरातला एक भाग कापुन दयायाला पण धैर्य पाहिजे. अशा धैर्यवान स्त्रीया आजही समाजात आहेत याचा अभिमान आपल्याला असलाच पाहिजे. खरचं मीनल नाई ला सुध्दा महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
स्त्रियांचा सन्मान ही आपली भारतीय संस्कृती आहे. स्त्री ही कालीमाता ,दुर्गामाता सुध्दा आहे हे विसरता कामा नये.. म्हणून नेहमीच लक्षात ठेवा.
• यत्र नार्यस्तु पूज्यन्ते, रमन्ते तत्र देवताः।
• यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफलाः क्रियाः।
म्हणजेच, जिथे स्त्रिया पूजियेल्या जातात तिथे नेहमी देवतांचा वास असतो आणि जिथे स्त्रियांना मान नाही, सन्मान नाही त्यांची पूजा नाही तिथे सगळी कार्य निष्फळ होतात.
सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
धन्यवाद
लेखिका--सौ.स्मिता लक्ष्मीकांत मोहरीर©️
नांदेड--7420918198