बल्लारपूर (का.प्र.) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या वतीने गांधी मैदान पवनी येथे राज्यस्तरीय आखाडा क्रीडा स्पर्धा 2025 चे आयोजन करण्यात आले होते, यामध्ये केजीएन पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, चंद्रपूरचा विद्यार्थी शिवम संजय ढवळे याने 25 किलो वजनी गटात तृतीय क्रमांक पटकावला, तर सांकेतिक मुकेश पिंपळकर याने 25 किलो वजनी गटात तृतीय क्रमांक पटकावला ।शाळेचे क्रिडा शिक्षक स्वपनील डंभारे यांचे विद्यार्थयाना उत्कुष्ट मार्गदर्शन लाभले व त्यांची निवड उडीसा येथे होणारी नैशनल शालेय क्रिडा स्पर्धेसाठी करण्यात आली आहे.विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळेचे संस्थापक शेख मेहमूद व प्राचार्या सुजाता करमनकर यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला.
राज्यस्तरीय शालेय स्पर्धेत केजीएन शाळेच्या विद्यार्थ्यांचे यश.!
byChandikaexpress
-
0