चंद्रपुर (वि.प्र.) : 8 मार्च ला आंतरराष्ट्रीय महिला दिवसानिमित्त चंद्रपूर जिल्हा डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघाच्या वतीने स्थानिक जटपुरा गेट जवळील जिल्हाध्यक्ष मुन्नाभाऊ तावाडे यांचे जनसपंर्क कार्यालयात दुपारी 3 वाजताचे दरम्यान शहरातील महिला पत्रकारांना निमंत्रित करून सर्व पत्रकारांना जेष्ठ समाजसेविका माननीया नम्रताताई ठेमस्कार यांचे हस्ते शाल, पुष्पगुच्छ व महिलांसाठी असलेल्या सरकारी कायद्याचे माहिती पुस्तक देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डिजिटल मीडिया संपादक संघाचे अध्यक्ष मा. मुन्नाभाऊ तावाडे तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा सहसचिव मा. दीपक कटकोजवार, तालुका अध्यक्ष मा.कांबळे यांची उपस्थिती होती. फोटो मध्ये सत्कारमूर्ती व प्रशिक्षित मास्टर ऑफ मास कम्युनिकेशन ची पदवी असलेल्या जर्नलिस्ट माधुरी कटकोजवार यांचा सत्कार आला तो क्षण.याप्रसंगी शहरातील मान्यवर पत्रकार बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघाने केला महिला पत्रकारांचा सत्कार .!
byChandikaexpress
-
0