गोंडवाना विद्यापीठस्तरीय तीन दिवसीय "व्यक्तिमत्व विकास" कार्यशाळेचा समारोप .!
चंद्रपूर (वि.प्र.) : येथील सरदार पटेल महाविद्यालयातील विद्यार्थी विकास विभाग, राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने गोंडवाना विद्यापीठस्तरीय तीन दिवसीय "व्यक्तिमत्व विकास" कार्यशाळा पार पडली.
या कार्यशाळाच्या समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एम. काटकर हे होते, तर यावेळी शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त आंतरराष्ट्रीय हॅण्डबॉल खेळाडू राजेश नायडू, चंद्रपूर वाहतूक शाखाचे पी.एस.आय. रवींद्र चेरपूरवार, चंद्रपूर नेहरू युवा केंद्राचे समन्वयक ॲड. देवा पाचभाई, शारीरिक शिक्षण संचालिका डॉ. पुष्पांजली कांबळे, विद्यार्थी विकास विभागाचे प्रमुख डॉ. प्रकाश बोरकर, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. कुलदीप आर. गोंड, डॉ. पुरुषोत्तम माहोरे, डॉ. निखिल देशमुख, डॉ. वंदना खणके, एल. के. एम. आई. एम. एस. आर. कोसाराचे डॉ. विवेक कवाडे, तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणातून बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एम. काटकर म्हणाले की, व्यक्तिमत्व विकासाचे मोठे महत्त्व आहे. तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक यशाला आकार देण्यामध्ये त्याची भूमिका महत्त्वाची आहे. ते इतरांशी संवाद साधण्याची, अर्थपूर्ण संबंध निर्माण करण्याची आणि आव्हानांना प्रभावीपणे हाताळण्याची तुमची क्षमता वाढवते असे नमूद केले.
कार्यशाळाच्या मार्गदर्शक राजेश नायडू म्हणाले की, व्यक्तिमत्व विकास ही तुमची मानसिकता, वर्तन आणि संवाद सुधारण्याची प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया तुम्हाला आत्मविश्वास निर्माण करण्यास, संवाद कौशल्यांना धारदार करण्यास आणि जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोन विकसित करण्यास मदत करते असे सांगितले.
पीएसआय रवींद्र चेरपूरवार हे विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा अभियान या विषयावर मार्गदर्शन करताना म्हणाले की, असुरक्षित 'ड्रायव्हिंगचा ट्रेंड' वाढत आहे, ज्यामुळे वाहन अपघात होतात, परिणामी अनेक लोकांचा मृत्यू होतो, गंभीर दुखापत होते किंवा त्यांचे शरीराचे अवयव कायमचे गमावले जातात. यापैकी बरेच अपघात ड्रायव्हिंगचे कौशल्य कमी असणे, रस्ता सुरक्षा खबरदारीचे पालन न करणे, जागरूकतेचा अभाव आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन यामुळे होत असल्याचे सांगितले.
या तीन दिवसीय कार्यशाळेत विविध विषयांवर मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. त्यात आरोग्य शिक्षण शारीरिक, मानसिक आरोग्य या विषयावर डॉ. उषा अरोरा, स्त्री पुरुष समानता या विषयावर डॉ. पुरुषोत्तम माहोरे, पर्यावरण जागृती या विषयावर डॉ. निखिल देशमुख, योग शिक्षण या विषयावर डॉ. कुलदीप आर. गोंड, कौशल विकास आणि राष्ट्रीय एकात्मता या विषयावर डॉ. राजकुमार बिरादार यांनी मार्गदर्शन केले. तसेच उत्कृष्ट कार्य करणाऱ्या स्वयंसेवकांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
या समारोपीय कार्यक्रमाचे संचालन रसेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. पुरुषोत्तम माहोरे यांनी, तर आभार रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. कुलदीप आर. गोंड यांनी मानले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता हनुमंत डोंबारे, राजू इंगोले, दर्शन मेश्राम, गौरव झाडे, साहिल गायकवाड, नेहा भोमले, शालिनी निर्मलकर, रोशन चौधरी, भैरव दिवसे, अमित मिळावी, अंकिता लिफ्टे, स्नेहा चौधरी यांनी अथक परिश्रम घेतले.
सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अरविंद सावकार पोरेड्डीवार, कार्याध्यक्ष आ. किशोर जोरगेवार, उपाध्यक्ष सुदर्शन निमकर, सगुणा तलांडी, सचिव प्रशांत पोटदुखे, सहसचिव कीर्तीवर्धन दीक्षित, कोषाध्यक्ष संदीप गड्डमवार, सर्वोदय शिक्षण मंडळाचे कार्यकारी सदस्य राकेश पटेल, सुरेश पोटदुखे, चंद्रशेखर वाडेगावकर, जीनेश पटेल, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एम. काटकर, उपप्राचार्य डॉ. स्वप्नील माधमशेट्टीवार, प्रभारी प्रबंधक विनोद चोपावर यांनी उपरोक्त उपक्रमाबद्दल शुभेच्छा दिल्यात.