बल्लारपुर (का.प्र.) : महात्मा ज्योतिबा फुले कला वाणिज्य महाविद्यालय बल्लारपूर येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृह येथे दिनांक: 15/02/ 2024 रोजी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शुभेच्छा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बी. डी. चव्हाण प्रभारी प्राचार्य, प्रमुख पाहुणे श्री. राजू वानखेडे सहाय्यक शिक्षक जनता हायस्कूल( डेपो शाखा) बल्लारपूर, प्रमुख उपस्थिती प्राध्यापक डॉ. रोशन फुलकर आणि प्राध्यापक दिवाकर मोहितकर यांची मंचावर उपस्थिती होती.
प्रथमताः मंचावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या फोटोला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
प्राध्यापक दिवाकर मोहितकर यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की, बारावीनंतर विद्यार्थी यश संपादन करून आपल्या जीवनात बदल घडवू शकतो.प्राध्यापक डॉ. रोशन फुलकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, विद्यार्थ्यांनी सामाजिक वारसा जतन करून ठेवला पाहिजे. ज्ञान हे शिक्षण आणि चांगल्या संस्कारातून प्राप्त होते. प्रमुख पाहुणे श्री. राजू वानखेडे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, विद्यार्थ्यांना आपला सर्वांगीण विकास करणे जरुरी आहे. त्या विकासात प्राध्यापक वर्ग हातभार लावू शकतो याचा फायदा त्यांनी करून घ्यावा. तसेच बारावीनंतर अभ्यासक्रमाचे मार्ग याबाबत माहिती दिली.
अध्यक्षीय भाषण करतांना डॉ. बी. डी. चव्हाण यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी चिंतन आणि मनन करणे आवश्यक आहे. आत्मविश्वास त्यांच्यामध्ये असला पाहिजे आणि अभ्यासाचे नियोजन करणे आवश्यक आहे. तेव्हाच त्यांना चांगले गुण प्राप्त होतात आणि यशाची शिखरे खुली होतात. कार्यक्रमाचे संचालन कु. पूजा कुंभारे आणि आभार प्रदर्शन कु. रिया येवले यांनी केले. या शुभेच्छा कार्यक्रमाला वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.