पुणे (वि.प्र.) : दिनांक 8 आणि 9 सप्टेंबर 2024 रोजी मधु तारा दिव्यांग सेवा सोशल फाऊंडेशन प्रमुख श्री नितीनजी शिंदे आणि मधु तारा पुणे जिल्हा प्रमुख श्री अनिलजी दांगडे हे दोन* *दिवसाच्या कोकण आणि सातारा दौऱ्यावर असताना चिपळूण येथील महात्मा फुले जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत योजना अंतर्गत गोरगरीब रुग्णांसाठी कॅन्सर तसेच अन्यही आजारांवर उपचार देणाऱ्या वालवरकर हॉस्पिटलला भेट दिली.
या वेळी हॉस्पिटलच्या प्रमुख डायरेक्टर डॉ पाटील मॅडम यांनीमधु ताराच्या कार्याची प्रशंसा करत हॉस्पिटल कशा प्रकारे कार्य करते याची माहिती दिली.तसेच कॅन्सर पूर्वीच्या चाचण्या ही ट्रस्टच्या माध्यमातून मोफत केल्या जातात असेही सांगितले. तसेच हॉस्पिटलच्या प्रशासकीय टीमने मधु ताराला संपूर्ण हॉस्पिटलची पाहणी करून दाखवली.या वेळी पेट स्केन.रेडिएशन.वॉर्ड.ओपीडी याची पाहणी करून दाखवत सर्व माहिती दिली.
या वेळी मधु तारा प्रमुख यांनी कोकण येथील रुग्णांसाठी हे हॉस्पिटल जीवन देणारे ठरत आहे असे म्हणत आज मधु तारा टीमला सर्व माहिती दिल्या बद्दल संपूर्ण हॉस्पिटलचे प्रशासनाचे आभार मानले.