युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या विदर्भ महिला कार्यकारी अध्यक्षपदी जर्नलिस्ट माधुरी कटकोजवार यांची नव्याने नियुक्ती .!
चंद्रपूर (वि.प्र.) : अखिल भारतीय स्तरावर विस्तार झालेल्या "युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या विदर्भ विभागिय महिला आघाडीच्या कार्यकारी अध्यक्षपदी" चंद्रपूर येथील सुपरिचीत जर्नलिस्ट माधुरी कटकोजवार यांची नियुक्ती राष्ट्रीय अध्यक्ष श्री.गणेशभाऊ कचकलवार यांनी अलिकडेच पुन्हा एकदा नियुक्ती केली असून ओळख पत्र ही प्रदान केले आहे. जर्नलिस्ट माधुरी कटकोजवार ह्यांनी मास कम्युनिकेशन (जनसंवाद) च्या मास्टर पदवीचा अभ्यासक्रम मेरीट श्रेणीत उत्तीर्ण केलेला आहे. सोबतच हिन्दी विषयात त्यांनी गोल्ड मेडल मिळविले आहे. माधुरी कटकोजवार ह्या स्थानिक सरदार पटेल महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक पदावर कार्यरत असुन चंद्रपूर संग्राम यू ट्यूब न्यूज चॅनलच्या मुख्य संपादक आहेत. या नियुक्तीचे महिला वर्गात आनंद व्यक्त केल्या जात असुन माधुरीताईंचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.