जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर या शाळेत पालक शिक्षक सभा संपन्न .!

बल्लारपुर (का.प्र.) : जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर या शाळेत दिनांक: 11/07/2025 रोजी पालक शिक्षक सभा घेण्यात आली.
सत्र: 2025- 26 ची पालक शिक्षक संघ कार्यकारणी याप्रमाणे आहे.
1) श्री. बी. बी. भगत (मुख्याध्यापक)- अध्यक्ष 
2) सौ. मनीषा पप्पू महानंद (पालक प्रतिनिधी)- उपाध्यक्ष
3) श्री. आर. बी. अलाम (शिक्षक प्रतिनिधी)- सचिव 4)सौ. शुभांगी दुर्गे (पालक प्रतिनिधी)- सहसचिव 
5) सौ. एस. एन. लोधे (महिला शिक्षक प्रतिनिधी)- सहसचिव 
6) कु. राशी राहुल वेले (विद्यार्थी प्रतिनिधी)
तसेच प्रत्येक वर्गातील एक विद्यार्थी व वर्गशिक्षक सदस्य असतील.
प्रथमता: मंचावर उपस्थित मान्यवरांचे हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या फोटोला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. शब्दसुमनाने पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.
 मागील सभेचे अहवाल वाचन करणे व मंजुरी घेणे याबाबत श्री. आर. के. वानखेडे यांनी माहिती दिली.
सभाध्यक्षांच्या परवानगीने वेळेवर येणाऱ्या इतर विषयात सभेत उपस्थित केलेले प्रश्न, समस्या याबाबत सभाध्यक्ष मान. बी. बी. भगत यांनी पालकांच्या समस्याचे समाधान केले.
श्री. अलाम सर यांनी सांगितले की, एन. ई. पी. 2020 नुसार विद्यार्थ्यांना शिकवणे आवश्यक आहे. पालकांना आस्था असली पाहिजे.






आपले अध्यक्षीय भाषण करताना मान. बी. बी. भगत मुख्याध्यापक यांनी सांगितले की, विद्यार्थ्यात परिवर्तन साठी पालकांचे सहकार्य अपेक्षित आहे. सराव करणे आवश्यक आहे. पालकांनी जागरूक असले पाहिजे.
प्रास्ताविक श्री. आर. बी. अलाम, संचालन श्री. आर. के. वानखेडे व आभार श्री. एस. एम. चव्हाण यांनी मानले. सभेत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard. ".