महाराष्ट्राच्या इतिहासाला कलाटणी देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजाच्या चेतना यात्रेचा शुभारंभ होणार - पत्रकार परिषदेत जनार्दन पाटील यांची माहिती .!
चंद्रपूर (वि.प्र.) : छत्रपती शिवरायाच्या इतिहासाला जवळ पास ३५० वर्ष लोटली तरी दिल्ली येथे कोणत्याही संघटनेचे कार्यालय नाही ही शोकांतिका असून या भारताला छत्रपती शिवाजी महाराजाचा संघर्ष, न्याय, निती,त्यांच्याकडून काय? आदर्श घ्यावा याबाबत पुण्यावरून चेतना यात्रेचा शुंभारभ जेष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते करणार असल्याचे आज दि.५ जुलैला ४ वाजता चंद्रपूर श्रमिक पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत जनार्धन पाटील यांनी सांगितले.
जनार्धन पाटील म्हणाले की, दिल्ली येथे इतर राज्यातील कार्यक्रम संघटना घेत असतात मात्र महाराष्ट्रातील कोणताही पुढारी किंवा संघटना कोणताही उपक्रम किंवा कार्यक्रम घेण्यासाठी पुढे येत नाही.संपूर्ण भारताला छत्रपती शिवाजी महाराजाचा संघर्ष,न्याय, निती व त्यांचा आदर्श कळवा यासाठी या चेतना यात्रेचा शुभारंभ पुणे येथून करून आंध प्रदेश, तेलंगणा, ओरिसा, झारखंड, उत्तरप्रदेश, बिहार, पंजाब,हरीयाणा, दिल्ली, जयपुर, गुजरात अशी यात्रा भं्रमती करून सदर यात्रेचे समापन रायगड येथे होणार असल्याचे त्यांनी सांगितले.तसेच ग्रामीण भागात उत्कृष्ट प्रगती किंवा उपक्रम राबविणार्यां नागरिकांचा शिवशौर्य म्हणून सन्मान करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला जनार्धन पाटील, अ.भा.कुणबी महासंघाचे डि.के.आरीकर, महिला जिल्हाध्यक्ष विद्या चित्ताडे, जिल्हाध्यक्ष अतुल ठाकरे व संशिप्ता शिंदे आदीसह उपस्थित होते.