नागपुर (वि.प्र.) : लोकमान्य टिळक जनकल्याण शिक्षण संस्थाद्वारा संचालित ज्योतिबा माध्यमिक विद्यालय मध्ये भरोसा सेल शाखेच्या पोलीस विभागाच्या माननीय सुनीता मॅडम , शीतल पाटील मॅडम, पूजा यादव मॅडम या अधिकाऱ्यांनी ज्योतिबा माध्यमिक विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना स्वतःचे संरक्षण कसे करायचे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले .कार्यक्रमाचे आयोजक ज्योतिबा माध्यमिक ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्य सौ. अरुणा कडू मॅडम, पर्यवेक्षक श्री. वांदे सर यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपूर पोलीस भरोसा सेल गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी उत्कृष्ट असं मार्गदर्शन करून मुलींमधले भीतीचे वातावरण दूर करून मुलींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण केले कार्यक्रमाचे संचालन सौ.तृप्ती मेंढेकर यांनी केलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ.साटोने मॅडम व इतर सर्व सहकारी शिक्षकांनी कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सहकार्य केले