‘ग्रामगीतेतील क्रांतीदर्शित्व’ ग्रंथाचा श्रीस्थानक साहित्य पुरस्काराने गौरव .!
भद्रावती (ता.प्र.) : साहित्यिक डॉ. ज्ञानेश हटवार यांच्या ‘ग्रामगीतेतील क्रांतीदर्शित्व’ या ग्रंथाला राज्यस्तरीय श्रीस्थानक साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ठाणे येथे आयोजित शारदोत्सव २०२६ च्या तिसऱ्या सत्रात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. शाल, सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
महाराष्ट्रातून प्राप्त झालेल्या सुमारे ५०० पुस्तकांमधून या ग्रंथाची पुरस्कारासाठी निवड झाली. या ग्रंथात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीतेतील परिवर्तनवादी, क्रांतिकारी आणि समाजप्रबोधनपर विचारांचा चिकित्सक अभ्यास मांडण्यात आला आहे.
या सन्मानाबद्दल मनोगत व्यक्त करताना डॉ. हटवार यांनी हा पुरस्कार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा गौरव असल्याचे सांगितले. आजच्या समाजाला ग्रामगीतेतील विचारांची नितांत आवश्यकता असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या पुरस्कारामुळे भद्रावतीसह चंद्रपूर जिल्ह्याच्या साहित्यिक क्षेत्राचा नावलौकिक वाढला असून, डॉ. ज्ञानेश हटवार यांच्यावर साहित्यप्रेमी, शिक्षक आणि मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. हा सन्मान गुरुदेव भक्तांसाठीही अभिमानाची बाब ठरला आहे.