भद्रावती (ता.प्र.) - कर्मवीर विद्यालय गवराळा भद्रावती येथील एमसीव्हिसी विभागाचे प्राध्यापक विनोद घोडे यांचे आज पहाटे पाच वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. विनोद घोडे सर हे रोटरी क्लब भद्रावतीचे सदस्य असून विविध सामाजिक संघटनांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. ज्वेलर असोसिएशनचे ते पदाधिकारी होते. खरेदी विक्री सोसायटीचे ते संचालक होते. त्यांच्या पक्षात पत्नी, मुलगा, मुलगी,भावंड व बराच मोठा आप्तपरिवार आहे. सामाजिक चळवळीत सदैव काम करणारे, सदैव हसत मुख व्यक्तीमत्व गेल्याने समाज मनात हळहळ व्यक्त होत आहे.