नागपुर (चंडिका एक्सप्रेस) - सी. एम. लोणारे (मुख्य संपादक) भोई गौरव (मासिक) 9960014116
सध्या सर्वच ग्रुपवर संत भीमा भोई जयंतीचे पोष्टर झळकत आहे. भोई समाजाच्या अनेक सामाजिक संघटनांनी संत भीमा भोई जयंती साजरी करण्याची जय्यत तयारी सुरू केली आहे. आपल्या सर्वच ग्रुपवर संत भीमा भोई जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देणाऱ्यांची स्पर्धा लागली आहे.काहींचे पोष्टर युद्ध सुरू आहे. आपला समाज तसाही जयंती पुण्यतिथी साजरी करण्यात अग्रेसर आहे. आपण अंध भक्त आहोत.वास्तविकता जाणून घेण्याचा कधी प्रयत्नच करीत नाही. अलीकडे तर जयंती पुण्य तिथी साजरी करण्याचे फॅड आलं आहे. मच्छिन्नद्रनाथ, नाथुबाबा, कल्लूबाबा,वाल्मिकी, निषादजी, केवटजी,एकलव्य,भोईदेव,झिंगुजी महाराज,अलीकडे संत भीमा भोई इत्यादी परंतु दलित समाजाचे फक्त आंबेडकर, बौद्ध हेच श्रद्धास्थान आहे.त्यांचे कुणी देव,बाबा व संत नाही म्हूणन ते आज प्रत्येक क्षेत्रात आपल्या पेक्षा प्रगत आहे. मातंग समाजाचे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व क्रांतिवीर लहुजी साळवे हेच त्यांचे श्रद्धास्थान आहे. त्यांनीही सर्वच क्षेत्रात प्रगती केली आहे. आपण मात्र अजूनही जयंती पुण्यतीथी साजरी करण्यात आपला वेळ व पैसा खर्च करतो.या संस्थेने केली मग मी का करू नये. मी काय त्याच्यापेक्षा कमी आहे.जणू जयंतीची स्पर्धा सुरू असल्यासरखे वाटते.पूर्ण whatsapp ग्रुप जयंतीच्या शुभेच्छानी हाऊसफुल झाले आहे. परंतु संत भीमा भोई कोण होते?ते खरंच भोई होते का?की त्यांच्या नावामागे भोई शब्द लागला आहे म्हणून ते भोई समाजाचे आहे का? याचा खरा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करीत नाही.फक्त अंध विश्वास त्यांनी शुभेच्छा दिल्या म्हणून मी देतो एवढंच! किती लोकांना संत भीमा भोई यांचा खरा इतिहास माहीत आहे? किती लोकांनी तो माहिती करून घेण्याचा प्रयत्न केला ? ज्यांनी केला असेल त्यांनी भीमा भोई कोण? कोणत्या जातीचे? याची खरी माहिती समाजासमोर का आणली नाही? ज्यांच्याजवळ माहिती असेल तर ती समाजासमोर आणली पाहिजे. माझ्या माहिती प्रमाणे संत भीमा भोई हे भोईसमाजाचेच आहे याचा कुठेच पुरावा नाही. त्यांच्या नावामागे भोई शब्द आहे म्हणून ते भोई जातीचे आहे हे आपण सिद्ध करू शकत नाही. मग कोण होते संत भीमा भोई ज्यांची आपण जयंती साजरी करतो. थोडक्यात माहिती - 1850 ते 1895 ही संत भीमा भोई यांची कारकीर्द ते फक्त 45 वर्ष जगले.ते ओडिशा राज्यातील संत कवी व तत्वज्ञ होते.भीमा भोई हे महिमा स्वामींचे भक्त होते. महिमा स्वामींना महिमा गोसाईन म्हणून ओळखल्या जातात.महिमा स्वामी यांचे पासून भीमा भोई यांना महिमा धर्म ही दीक्षा मिळाली. ही एक भारतीय धार्मिक परंपरा आहे.सत्य महिमा धर्म हा त्यांचा धर्म होता. व या धर्माचा त्यांनी प्रचार व प्रसार केला.त्यांच्या पत्नीचे नाव अन्नपूर्णा होते.त्यांना दोन अपत्य होते.कपीलेश्वर( मुलगा) व लंबन्याबाटी ( मुलगी) जगाची मानवता आणि मुक्ती ही त्यांच्या काव्य निर्मितीची मुख्य थीम होती.माझे जीवन विस्मय कारक राहू द्या जगाला मोक्ष प्राप्त होऊ द्या. सामाजिक व आर्थिक परिस्थितीचे स्पष्ट प्रतिबिंब त्यांच्या काव्यात व तत्वज्ञानात दिसत होते. वंचित लोकांच्या उत्कर्षसाठी त्यांनी भरीव कार्य केले. भीमा भोई यांच्या जीवनावर व कवितांचा अभ्यास करण्यासाठी ओडिशाच्या काही विद्वानांनी भीमाच्या प्रभावाबद्दल संशोधन करण्यसाठी कलिंग सामाजिक विज्ञान संस्था मध्ये गंगाधर मेहर विद्यापीठ येथे अलीकडेच संशोधन खुर्च्या स्थापन केल्या आहे. जसे आपल्या विद्यापीठात आंबेडकर थॉट्स, गांधी थॉट्स, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार धारा, संत गाडगेबाबा विचारधारा,फुले,शाहू यावर संशोधन केले जाते त्याप्रमाणे भीमा भोईच्या सन्मानार्थ बोलींगर मेडिकल कॉलेजला भीमा भोई मेडिकल कॉलेज असे नाव देण्यात आले आहे. त्यांची ग्रंथ निर्मिती, स्तुती चिंतोमनी, ब्रम्ह निरूपिता गीता, निर्वाद साधं 1895 ला वयाच्या अवघ्या 45 व्या वर्षी शीवचतुर्थीला सबर्नपूर ओडिशा येथे त्यांचा अंत झाला. त्यांच्या मृत्यू नंतर खलीआपली येथे एक समाधी मंदिर आहे व त्या ठिकाणी त्यांच्या पवित्र स्मृती आहे. जन्म - संत भीमा भोई यांचा जन्म वैशाख पौर्णिमा 1850 ला ओडिशा राज्यात जटासिंघा या गावी सुवर्णपूर जिल्ह्यातील संबलपूर पूर्वीचे Rairakhol odisha येथे झाला असा अनेक ठिकाणी उल्लेख आहे.काही ठिकाणी जटासिंघ गावात एका तलावाच्या काठावर पाम आशेष देवीच्या स्तंभाजवळ एक बाळ सापडले होते तेच हे भीमा भोई असाही उल्लेख आहे. परंतु विविध स्तोत्रांनी त्यांची वेगवेगळी जन्मस्थळे व वेगवेगळी वर्ष दिली आहे. ते गरीब परिवारात जन्माला आले ते लहान असतानाच त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला.त्यांच्या आईने पुनः विवाह केला त्यामुळे भीमा भोई अनाथच राहिले असा त्यांचा जन्माचा इतिहास आहे. संत भीमा भोई यांचे कुटुंब खोंड जातीचे होते. खोंड जातीबाबत थोडक्यात विवेचन - खोंड जात (khond tribe) (Khond are a tribal group found in the hill and jungals of Orissa translate as mounteneer and probably comes from Dravidian word konda) ओरिसा राज्यातील ही एक आदिवासी जमात आहे. जंगल व पहाडी भागात समूहाने राहतात. त्यांचा मुख्य व्यवसाय भाताची शेती करणे.शिकार करणे, जंगलातुन कंद मुळे, विविध प्रकारची जंगली फळ गोळा करणे व त्यावर उदरनिर्वाह करणे हा त्यांचा व्यवसाय आहे.त्यांची संख्या एक मिलियन पेक्षा जास्त आहे. ही एक ओडिशा राज्यातील आदिवासी जमात आहे त्यांना या राज्यात आदिवासींच्या सोयी सवलती सुद्धा मिळतात. परंतु ते मच्छिमार भोई होते त्यांच्या कुटुंबाचा व्यवसाय मासेमारी होता असा कुठेही उल्लेख नाही त्यामुळे ते आपले संत कसे?फक्त भोई नाव आहे म्हणून ते आपल्या जातीचे आहे असा आपण समाज करून बसलो आहे. कोणताही खरा इतिहास माहीत करून न घेता आपण संत भीमा भोई जयंती साजरी करतो आहे.ही आपली फक्त अंधश्रद्धा आहे. ते खरच भोई जातीचे आहे याचा कुणाजवळ पुरावा किंवा माहिती असल्यास त्यांनी समाजासमोर नक्की आणावी. मी संत भीमा भोई बद्दल आज जी माहिती लिहली आहे. ती शंभर टक्के खरीच आहे असा दावा मी करत नाही.ज्यांच्या जवळ त्यांच्या जातीबद्दल माहिती असल्यास त्यांनी नक्की share करा. परंतु मी जो काही अभ्यास केला माहिती मिळवली त्यावरून हे सिद्ध होते की भिमा भोई आपले संत नाही. आता प्रतेक समाज बांधवाने विचार करायचा आहे की संत भीमा भोई जयंती साजरी करायची किंवा नाही.माहिती मिळून सुद्धा आपण तीच चूक पुन्हा केली तर ती केवळ अंधश्रद्धा ठरेल. टीप - कोणावरही टीका टिपणी करणे या उद्देशाने हा लेखन प्रपंच नाही परंतु समाज जर चुकीच्या दिशेने जात असेल तर समाज, प्रबोधन होणे गरजेचे आहे म्हणून हा लेखनप्रपंच समाजच्या हितासाठी समाजाला जागृत करण्यासाठी जास्तीत जास्त समाजबांधवापर्यंत हा लेख फॉरवर्ड करा सर्व ग्रुपवर फॉरवर्ड करा.एवढीच विनंती.