भद्रावती (ता.प्र.) - भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती द्वारा संचालित यशवंतराव शिंदे विद्यालय चिचोर्डी भद्रावती चा निकाल 98 .76 टक्के लागला असून उत्तम निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. विद्यालयातील 30 विद्यार्थी प्रवीण श्रेणीत उत्तीर्ण झाले असून ,कुमारी सानिया कांबळे या विद्यार्थिनीने 86.60/% गुण घेऊन विद्यालयातून प्रथम येण्याचा मान पटकावला. कुमारी साक्षी ठावरी हिने 86.40% गुण घेऊन विद्यालय द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे .तर कु सृष्टी कौरासे 86. 20 टक्के गुण घेत तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. 14 विद्यार्थ्यांनी 80% च्या वर घेऊन नैपुण्य प्राप्त केले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर विवेक शिंदे ,संस्थेचे सचिव डॉक्टर कार्तिक शिंदे ,सहसचिव डॉ. विशाल शिंदे ,प्राचार्य डॉक्टर जयंत वानखेडे ,पर्यवेक्षक श्री ताजने सर, उमेश पाटील, नंदनवार, देशमुख, सुभाष कोल्हे , आसुटकर , लांबट सर अनंत चौधरी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत अभिनंदन केले आहे.