बल्लारपुर (का.प्र.) - काल दिनांक 14 जुन रोजी चंद्रपूर शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या व रामाळा तलावाच्या रस्त्याच्या भागातील शासकीय इमारतीवर एका युवकाची सेलो टेप ने हातपाय बांधुन निर्घृण हत्या करण्यात आल्याचे उघडकीस आले होते. सदर हत्येतील मयत हा राजुरा येथिल रहिवासी असुन तो चंद्रपूर येथे डॉ. स्वप्निल चिल्लरवर यांचेकडे वाहन चालकाचे काम करतो. स्टेट बँक ऑफ इंडिया समोरील माजी तहसीलदार पिंपळशेंडे ह्यांच्या घरी आपल्या आईसह किरायाने राहत होता. काल सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास तो आपल्या घरून चंद्रपूर येथे गेला मात्र रात्री त्याच्या हत्येचीच माहिती घरच्यांना कळली.
ह्या हत्येत 3 आरोपींचा सहभाग असुन तिघांनाही चंद्रपूर शहर पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली असुन त्यातील एकाला राजुरा येथुन तर दोघांना नागपुर येथुन ताब्यात घेण्यात आल्याची चर्चा आहे. मयत राहुल ठक वय अंदाजे 30 वर्ष ह्याचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून हा खुन करण्यात आला असल्याचे इंदिरा नगर राजुरा परिसरात बोलल्या जात असुन तो आरोपी सुद्धा इंदिरा नगर येथील रहिवासी असल्याची चर्चा आहे. मात्र हत्येचे नेमके कारण काय? ही हत्या कुणी केली? व आरोपींना कुठुन ताब्यात घेण्यात आले ह्याची अधिकृत माहिती पोलिस विभागातर्फेच प्राप्त होऊ शकेल.