बंडखोराना चेतवणा-यांचे काम संपले - अनिल गोटे

बंडखोराना चेतवणा-यांचे काम संपले आहे आता त्याचे भविष्य रामभरोसेच - राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष अनिल गोटे यांचे भाकीत 

मुंबई (जगदीश काशिकर) - थेट सर्वोच्च  न्यायालयात दाद मागून विजय झाल्याचा दावा बंडखोर  नेते एकनाथ  शिंदे यानी केला असला तरी कायद्याचे जाणकार मात्र तसे मानत नाहीत. बंडखोराना घाईगडबडीत  सर्वोच्च  न्यायालयांकडून वेळकाढू  प्रक्रियेत अडकवून त्यांच्या  राजकीय मास्टर मा इंडनी त्यांचे आजचे मरण उद्यावर ढकलण्याची खेळी केली आहे असे मत राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष  आणि माजी आमदार अनिल गोटे यानी म्हटले आहे. ते म्हणाले की भाजपाने पडद्या मागून बंडखोराना चेतवून सर्व रसद पूरवली आणि शिवसेना उभी फोडण्याच्या कुटील डावाचा पहिला टप्पा यशस्वी पार पाडला ! मात्र गोंधळलेल्या एकनाथ शिंदेना काही  पध्दतशीर गळाला लावल्याचे स्पष्ट होत असल्याचेअनिल गोटे म्हणाले. त्यानी सागितले की कुठल्याही राज्य सरकारवर अविश्वासाचा ठराव आणायचा असेल तर विधान सभाध्यक्ष व राज्यपाल हे महत्त्वाचे आहेत. यांना टाळून काहीच करता येत नाही. शहाणपणाचा मार्ग कसा होता की, विधीमंडळ पक्षात बंड झाले आहे. या संबंधीची माहिती विधानसभा अध्यक्षांना देणे. लगेचच राज्यपालांना एकोणतीस आमदारांच्या स्वाक्षरीचे पत्र राज्यपालांना देवून सभागृहाच्या पटलावर येणे. ज्येष्ठ  नेते गोटे म्हणाले की शरद पवार साहेबांनी नेमके हेच तर सांगितले होते. शरद पवार साहेबांच्या एवढ्या सरळ गोष्टीला विरोधकांनी गुंडगिरीचा रंग दिला. बघून घेऊ. वगैरे टपोरी छाप धमक्या देऊन गल्लीतील गावगुंडांच्या भांडणाचे स्वरुप देवुन टप्प्यात आलेला खेळ हातातून घालविला. आता सर्वोच्च न्यायालयाने खुंठी ठोकली. दावा फेटाळून तुम्ही अध्यक्ष वा राज्यपालांकडे जा, तेथे काही घडले नाही तर मग आमच्याकडे या असे सुचविले असते तरी बिघडलेला डाव सावरता आला असता. पण भाजपाच्या कसलेल्या कारस्थान्यांनी विधानसभा अध्यक्ष, राज्यपाल यांना गृहित धरून एकनाथ शिंदेंच्या अगतिकतेचा गैरफायदा घेत शिवसेनेत उभी फूट पाडण्याचा आपला कार्यक्रम पार पाडला. आता ११ जूलै पर्यंत आई जेवू घालीना बाप भीक मागू देईना, अशी त्रिशंकू अवस्था निर्माण करुन ठेवली. याक्षणी एकनाथ शिंदेना माझं मत पटणार नाही. कालांतराने आठवेल. तेव्हा हातात काही असणार नाही.असेही गोटे म्हणाले. ते म्हणाले की ११ जुलैला कोर्ट काय म्हणते निर्णय दिला तर ठिक आहे. नाहीतर पिटीशन दाखल करुन घेवून त्या पंधरा सोळा आमदारांना नोटीसा काढल्या त्यानंतर त्यांचे म्हणणे ऐकून निर्णय देवू असे म्हटल्यास  मग काय ? ! असा सवालही त्यानी केला आहे. दुसरी शक्यता म्हणजे आम्ही काही इथे तुमची राजकीय धुणी धुवायला बसलो नाहीत. अशा अर्थाचे शेरे मारुन योग्य त्या अथॉरिटीकडे जा असे सांगत तर मात्र बंडोबांचा थंडोबा होईल. अखेरीस बंडोबा थंड झाल्याशिवाय राहणार नाही. मी कुणाला नाउमेद करीत नाही. एवढेच लक्षात आणून देवू इच्छीतो की, नेहमीच मोठ्या माशाने लहान माशांचा समुह पचवून टाकला आहे. शेवटी हेच खरे की, मुझे तो अपनो ने ही लूटा, गैरो मे क्या दम था ! मेरी कश्ती वही डुबी, जहॉ पानी कम था ! असे शेवटी गोटे यानी म्हटले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.