माजी अर्थमंत्री आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या वतीने भाजपा पदाधिकाऱ्यांनी दिल्या शुभेच्छा..!
बल्लारपुर (का.प्र.) - दिनांक १८ जून २०२२ रोजी श्री माता कन्यका सेवा संस्था चंद्रपूर द्वारा आयोजित स्व. डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ फोर्टीज हॉस्पीटल मुंबई यांच्या विशेष सहकार्याने आयोजित बालकांच्या निःशुल्क हृदयरोग तपासणी शिबीरात जी बालके हृदयरोग शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरली ती बालके त्यांच्या पालकांसह दि. २७ जुलै रोजी मुंबईसाठी रवाना झाली.फोर्टीज हॉस्पीटल मुंबई येथे या बालकांवर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. दि. २७ जुलै रोजी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या वतीने भाजपा पदाधिकाऱ्यांनी रेल्वे स्टेशनवर सदर बालके व त्यांच्या पालकांची भेट घेत त्यांना सर्वतोपरी सहकार्यासाठी आश्वस्त केले. ही बालके यशस्वीपणे शस्त्रक्रिया होऊन ठणठणीत बरे होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी महानगर जिल्हााध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, भाजपा नेते रामपाल सिंह, भाजयुमो अध्यक्ष विशाल निंबाळकर, सुभाष कासनगोट्टूवार, शैलेंद्रसिंह बैस, राजेश सुरावार, सतिश तायडे, अमित कासनगोट्टूवार, यश बांगडे, रूद्रनारायण तिवारी, विठ्ठल डुकरे, सतिश तायडे, अनिश दिक्षीत, प्रदिप तिवारी, गजानन पिंपळशेंडे यांची उपस्थिती होती.