अनेक दिग्गज काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश..!

चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील अनेक दिग्गज काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

बल्लारपुर (का.प्र.) - महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्हाध्यक्ष व प्रदेश कार्यकारिणीची बैठक मुंबई येथे दि.12 जुलैला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात पार पडली. या बैठकीत चंद्रपूर जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीचे केंद्रीय अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार,प्रांताध्यक्ष आद.श्री.जयंत पाटील, मा.अजितदादा पवार, मा.श्री.छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.प्रांताधयक्ष मा.श्री.जयंत पाटील यांनी श्री. अरविंद रेवतकर माजी सरपंच ग्रा.प. भिसी,तथा उपजिल्हा अध्यक्ष काँग्रेस कमेटी चंद्रपूर.श्री श्रीनिवास शेरकी,माजी जि.प.सदस्य,तथा माजी तालुका अध्यक्ष काँग्रेस कमेटी चिमूर,श्री.पंकज रेवतकर सामाजिक युवा कार्यकर्ता,श्री.अक्षय खवसे अध्यक्ष भिसी नगर काँगेस कमेटी.यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे दुपट्टे घालून प्रवेश दिला. या सर्वांच्या प्रवेशासाठी जिल्हाध्यक्ष श्री.राजेंद्र वैद्य मागील ४ महिन्यांपासून प्रयत्नरत होते,मुंबईला झालेल्या या पक्ष प्रवेश कार्यक्रमाला श्री.मोरेश्वरराव टेमुर्डे,माजी विधानसभा उपाध्यक्ष,श्री.अरुण निमजे,माजी कृषी सभापती  जि.प.चंद्रपूर हे प्रामुख्याने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.