डॉक्टर विवेक शिंदे यांची अविरोध निवड!

भद्रावती (ता.प्र.) - गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या सिनेट निवडणुका जाहीर झाल्या आहेत. अनेकांनी आपले भवितव्य आजमावण्यासाठी या निवडणुकीकरिता सिनेटर साठी फॉर्म भरलेले आहे. ही निवडणूक 4 सप्टेंबरला होणार आहे.गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या सिनेट साठी मॅनेजमेंट कौन्सिल मधून डॉ. विवेक नीलकंठराव शिंदे भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती यांची अविरोध निवड करण्यात आली आहे. गडचिरोली विद्यापीठाच्या मागील पाच वर्षात ते व्यवस्थापन मंडळातून सिनेट सदस्य होते. मागील पाच वर्षात त्यांनी विद्यापीठाचे भरीव कार्य केले त्याचीच पावती म्हणून यावेळी त्यांना अविरोध निवडून दिला गेले.  त्यांच्या या अविरोध निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या निवडीबद्दल संस्थेचे माझे अध्यक्ष तथा विश्वस्त श्रीमती नीलिमा ताई शिंदे, सचिव डॉक्टर कार्तिक शिंदे, सहसचिव डॉक्टर विशाल शिंदे, प्राचार्य डॉ. जयंत वानखेडे, डॉ.सुधीर मोते ,डॉ. ज्ञानेश हटवार ,आर. टी. चव्हाण, शेखर जुमडे , किशोर ढोक, हरीहर मोहरकर आदींनी तसेच प्राध्यापक, शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.