बल्लारपुर (का.प्र.) - भद्रावती तालुक्यातील कोंढा गावात तान्हा पोळा सन उत्साहाने साजरा करण्यात आला.तान्हा पोळा हा बाल गोपालाचा आनंदाचा सन असतो. यामध्ये एकुण 192 स्पर्धकानी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव,पूरग्रस्त गावाची समस्या,पर्यावरण व संवर्धन,शेती काळाची गरज,मोबाईलचे दुष्परिणाम विविध विषयाचे आकर्षक देखाव्यासह सहभाग घेतला. सर्व स्पर्धकातून लकी ड्रा च्या माध्यमातून हर्ष राकेश मत्ते ची निवड करुन साई सर्विसेस कडून टि.व्ही.भेट देण्यात आली.नंदी बैल सजावटी चे प्रथम क्रमांक तन्वी काळे,द्वितीय क्रमांंक हर्ष मत्ते,तृतीय क्रमांक हिमांशी साखरकर,चतुर्थ क्रमांक लकी मन्ने,पाचवा क्रमांक अथांग राघमवार,सहावा क्रमांक अनुष्का देठे,सातवा क्रमांक अधिरा लांबट,आठवा क्रमांक शेरविन मोरे,नववा क्रमांक मृणाल वरारकर ,दहावा क्रमांक सुजल साखरकर,अकरावा क्रमांक साई पारखी ,बारावा क्रमांक ऋशभ नागपुरे यांची निवड करण्यात आली.तसेच सहभागी सर्व स्पर्धकाना पेपर वेट भेट देण्यात आले. तसेच गरिब व होतकरु मुलाना स्कुल बैग चे वाटप करण्यात आले.नंदी बैल स्पर्धेचे सजावट परिक्षण श्री.सुधाकर बत्की सर व श्री.संजय विरमलवार सर यांनी केले.कार्यक्रमाचे संचालन अभय राघमवार तर आभार गणेश उपरे यांनी मानले.सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी सरपंच महेश मोरे,उपसरपंच मंगेश मंगाम,सुनिल देठे,विजय ढेंगळे,अविनाश गोंडे,अजय मत्ते,महेश मत्ते,अमोल देठे,प्रदिप मांडवकर,नितीन गौरकर,राजू मत्ते,प्रकाश चिकटे,राजू ढेंगळे,प्रशांत चिकटे,भारत मोरे, राजू डोंगे,अतुल मत्ते,सुमित मत्ते,नितीन डोंगे,विजय मत्ते,विजय ठेंगे,अक्षय नागपुरे,संदीप कालर तसेच गुरुदेव सेवा मंडळ,मराठा वरियर्स मंडळ,जगन्नाथ मंडळ,न्यू जगन्नाथ मंडळ तसेच समस्त गावकरी यांनी सहकार्य केले.