भद्रावती (ता.प्र.) - पिपरी येथील वर्धा नदीला पूर आल्या मूळे गावाचा भद्रावतीशी संपर्क तूटल्या गेला . तसेच घुग्गूस कडे जानारा मार्ग सुद्धा बंद झाला आहे . पिपरी देश . कोच्ची घो नाड . चारगाव . ही गाव संपर्क क्षेत्राच्या बाहेर दिले . सतत येनाऱ्या पूरा ने . शेतकरी हवालदिस झाला आहे . तसेच तालुक्यातील कोंढा, माजरी, पळसगाव,व परीसरातील बऱ्याच गावांना पुराचा वेढा घातला गेला आहे शेतकरी या पुरामुळे भयग्रस्त आहेत. त्यांचे शेतीचे बरेच नुकसान झाले आहे. अधिकारी फक्त कागदावर नुकसान भरपाई लिहीत आहेत असा शेतकऱ्यांचा आरोप आहे. तेव्हा महसूल विभागाने प्रत्यक्ष पीक पाहणी करून नुकसान भरपाई नोंदवावी व याकडे तहसीलदाराने प्रामुख्याने लक्ष द्यावे अशी मागणी शेतकरी करत आहे. पुरामुळे सर्व जीवन विस्कळीत झालेले आहे.
"ग्राम पंचायत चंदनखेडा येथे जागतिक आदिवासी दिन तसेच राष्ट्रगीत गायन कार्यक्रम साजरा" -
भद्रवती तालुक्यातील सांसद आदर्श ग्राम चंदनखेडा येथे शासनाच्या आदेशाचे पालन करत प्रत्येक उपक्रम राबवित असतात त्याच प्रमाणे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त्याने विशेष उपक्रम राबवीत आहे 9 ऑगस्ट 2022 रोजी शासनाच्या आदेशाने प्रत्येक शासकीय कार्यालयात राष्ट्रगीत गायन करण्याचे होते त्याच आदेशाचे पालन करत ग्रामपंचायत कार्यालयात राष्ट्रगीत म्हणन्यात आले व 9 अगष्ट जागतिक आदिवाशी दिन हा शहिद बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात गावचे सरपंच नयन बाबाराव जांभुळे उपसरपंच सौ भरतीताई उरकांडे तसेच ग्रामपंचायत सदस्य श्री बंडुजी निखाते श्री नानाजी बागडे, सौ, मुक्ताताई सोनूले सौ प्रतिभा दोहतरे श्री निकेश भागवत, सौ रंजना हनवते सौ सविता गायकवाड , सौ श्वेता भोयर सौ आशा ननावरे, व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते।
.webp)
