भद्रावती (ता.प्र.) - भद्रावती- निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयात डॉ सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा वाढदिवस शिक्षक दिन कार्यक्रम घेऊन साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एल एस लडके प्रमुख वक्ते प्राध्यापक डॉ प्रवीण कुमार नासरे प्रमुख पाहुणे प्राध्यापक डॉ नथू वाढवे , प्राध्यापक डॉ अजय दहेगावकर , व प्राध्यापक डॉ कुंदन शहरे उपस्थित होते.या कार्यक्रमाची सुरुवात पाहुण्यांच्या स्वागताने व डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला माल्याअर्पण करून झाली.याप्रसंगी या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्राध्यापक डॉ प्रवीणकुमार नासरे यांनी गुरु व शिक्षकांबद्दल चे रामायण महाभारतात ते आज पर्यंतचे सर्व दाखले देत गुरुचे स्थान शिष्याच्या जीवनात किती महत्त्वाचे आहे तसेच विद्यार्थ्याला जीवनात प्रगती करायची असेल तर गुरु विषयी आदर व प्रेम व्यक्त करणे महत्त्वाचे आहे असे मत व्यक्त केले.तसेच याप्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थी ऋत्विक सोनारखन , ऋतुजा देहारकर , विभा तातेड , धनश्री नागोसे , रितू पासवान व आरती तेजावत या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करीत गुरु विषयी आपले जीवनातील स्थान किती महत्त्वाचे आहे यावर प्रकाश टाकला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एल एस लडके यांनी शिक्षक दिन का साजरा करतो याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले त्यात त्यांनी स्वतंत्र भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करतात या दिवशी प्रत्येक विद्यार्थी हा त्यांनी यशाच्या मार्ग दाखवणाऱ्या आणि घडविणाऱ्या शिक्षकांचे आभार मानतात तसेच आपल्या संस्कृतीमध्ये आईनंतर सर्वात महत्त्वाचे स्थान आपण आपल्या गुरूला देतो तसेच आई जशी मुलांवर संस्कार करते तसाच गुरु हा विद्यार्थ्यांना घडविण्याचे व त्यांना सक्षम करण्याचे काम गुरु करतो तसेच आजच्या या डिजिटल युगात सुद्धा गुरुचे स्थान कसे अठळ आहे त्याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन प्राध्यापक डॉ नरेंद्र हरणे तर आभार प्रदर्शन प्राध्यापक डॉ कुंदन शहारे यांनी केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्राध्यापक शशिकांत चित्रे , प्राध्यापक सचिन श्रीरामे , प्राध्यापक कुलदीप भोंगळे , प्राध्यापक देवानंद भवरे , श्री आखतकर , श्री भावरकर , श्री तेलंग , श्री मानकर यांनी सहकार्य केले याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते.
