बल्लारपुर (का.प्र.) - मोहसीन भाई जवेरी कन्या महाविद्यालयात ५ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत शिक्षक दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून झाली. शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थिनीनी एक दिवसीय शिक्षिकेची भूमिका साकारली होती. यात प्रथम रोहिणी चव्हाण, द्वितीय खुशी पटघरीया व तृतीय अल्मात सय्यद मानकरी ठरल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापिका रुबीना खान मॅडम, प्रमुख अतिथी रासेयो अधिकारी प्राध्यापिका विना झाडे त्याचप्रमाणे प्राध्यापिका सुनीता चौधरी मॅडम यांची मंचावर उपस्थिती होती. प्रा. रुबीना खान, प्रा.विना झाडे तसेच प्रा.सुनिता चौधरी मॅडमनी गुरुची माहीती या विषयावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयीन प्राध्यापिका, राष्ट्रीय स्वयंसेवक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
मोहसीन भाई जवेरी कन्या महाविद्यालय, बल्लारपूर येथे शिक्षक दिन साजरा करण्यात आला..!
byChandikaexpress
-
0
