नारायणा स्कूल येथे वृक्षारोपण कार्यक्रम.!
भद्रावती (वि.प्र.) - नारायणा प्री प्रायमरी स्कूल भद्रावती येथे वृक्षारोपण कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना प्रा. डॉ ज्ञानेश हटवार यांनी "प्रत्येकाने वृक्षारोपण करून त्याचे संवर्धन करणे आवश्यक असल्याचे" विचार मांडले.
भद्रावती येथील नारायण प्री प्रायमरी स्कूल भद्रावती येथे आज 29 जुलै २०२४ ला वृक्षारोपण कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा डॉ ज्ञानेश हटवार हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून प्रतिमा चक्रवर्ती मॅडम मुख्याध्यापिका ह्या व्यासपीठावर उपस्थित होत्या.
यावेळी विद्यार्थ्यांनी झाड,फळ, फुले, सुर्य , निसर्ग अशा विविध वेशभूषा धारण करून मनोवेधक गीत गायन केले. काही विद्यार्थ्यांनी वृक्षांचे महत्त्व कथन केले. यावेळी अध्यक्ष डॉ ज्ञानेश हटवार यांनी विद्यार्थ्यांना कथेच्या माध्यमातून वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचे महत्त्व सांगितले.
यावेळी विद्यालय परिसरात वृक्षारोपण करून वृक्षसंवर्धनाची जबाबदारी सर्वांनी स्विकारली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माधुरी चव्हाण यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनीता यादव यांनी केले तर आभारप्रदर्शन अंजली राव यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी प्रिया डांगे व संतोष राजभर व ईतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.