एपीजे अब्दुल कलाम यांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा.. प्राचार्य डॉ जयंत वानखेडे .!
भद्रावती (वि.प्र.) : भद्रावती शिक्षक संस्था भद्रावती द्वारा संचालित यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चिचोर्डी, भद्रावती येथे माजी राष्ट्रपती, भारतरत्न, डॉ एपीजे अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथी निमित्त 'वाचन प्रेरणा दिन" साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात अध्यक्षीय मार्गदर्शन करताना माजी राष्ट्रपती,भारतरत्न, डॉ एपीजे अब्दुल कलाम यांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा व प्रगती साधावी असे मार्गदर्शन केले.
यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती येथे माजी राष्ट्रपती, भारतरत्न,मिसाईलमॅन, डॉ एपीजे अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष प्राचार्य डॉ जयंत वानखेडे, प्रमुख अतिथी प्राध्यापक कमलाकर हवाईकर, प्राध्यापक संगीता जक्कुलवार , प्रेमा पोटदुखे व्यासपीठावर उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ जयंत वानखेडे यांनी विद्यार्थ्यांनी भारतरत्न डॉ एपीजे अब्दुल कलाम यांचा आदर्श ठेवून आपली प्रगती करावी असे आवाहन केले.
या प्रसंगी कुमारी भूमिका लांडगे, मीनाक्षी गेडाम , प्रियंका चौधरी या विद्यार्थिनींनी आपल्या मनोगत व्यक्त केले. प्रा. कमलाकर हवाईकर यांनी त्यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. प्रा. डॉ सुधीर मोते सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. आचल उईके हिने केले तर कु. मीनाक्षी गेडाम हिने आभारप्रदर्शन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक, प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.