बल्लारपुर (का.प्र.) - नागपूर विभाग शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित चंद्रपूर च्या वतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधून संस्थेतील सभासद सदस्यांचा सत्कार करण्यात आला. ज्यांनी शिक्षण क्षेत्रात प्राविण्य प्राप्त केले आहे. ज्यांनी आचार्य पदवी प्राप्त केली . संस्थेचे सदस्य जे सेवा निवृत्त झाले त्याचप्रमाणे संस्थेतील सदस्यांच्या पाल्यांनी विवीध क्षेत्रात यश संपादन केले आहे अशा सर्व गुणवंतांचा सत्कार समारोह जिजाऊ गार्डन दाताळा रोड चंद्रपूर येथे संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर नागपूर विभाग शिक्षक शिक्षकेत्तर सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री सुधाकर अडबाले, श्री बळराज धोटे, राष्ट़्पती पुरस्कार प्राप्त श्री महादेव पिंपळकर, संध्याताई गोहोकर, डॉ. अनिल शिंदे, श्री. शाम धोपटे, प्राचार्य डॉ. एम. सुभाष आदी मान्यवर उपस्थिती होते.नागपूर विभागीय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पत संस्था चंद्रपूर द्वारा संस्थेतील सभासदांच्या पाल्यांचा विविध शैक्षणिक विभागात गुणवत्ता प्राप्त केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. त्याच प्रमाणे या पतसंस्थेच्या सभासदांनी सेवेत असतांना आचार्य पदवी प्राप्त केली त्या सर्व गुणवंत , प्रज्ञावंत शिक्षकांचा शिक्षण दिनाचे औचित्य साधुन शाल, श्रीफळ व भेटवस्तू व स्मृती चिन्ह देऊन सत्कार व गौरव करण्यात आला.
भद्रावती येथील यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालय चिचोर्डी भद्रावती येथील मराठी चे प्राध्यापक डॉ. ज्ञानेश दयारामजी हटवार यांनी आचार्य पदवी प्राप्त केल्या बद्दल तसेच सामाजिक कार्य करत असल्याने त्यांचा पतसंस्थेच्या वतीने शिक्षक दिनाच्या दिवशी सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री सुधाकर अडबाले यांनी केले. पतसंस्थेच्या विकासाचा आराखडा त्यांनी सन्माननीय सत्कार मूर्ती व ऊपस्थित पालकांसमोर मांडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सुनिल शेरकी सर यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येत शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी तसेच गुणवंत विद्यार्थी , पालक, सेवानिवृत्त शिक्षक मोठ्या संख्येत उपस्थित होते.
