महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात बालकांचा सर्वांगीन या विषयावर मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन..!
बल्लारपुर (का.प्र.) - महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात दिनांक 16 /9/ 2022 शुक्रवारला बालकांचा सर्वांगीणविकास या विषयावर मार्गदर्शनपर कार्यक्रम घेण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेच्या फोटोला माल्यार्पण करून करण्यात आली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.जुनघरे प्रा. पवार , महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय उपस्थित होते. विशेष मार्गदर्शनपर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. वासंती खाडिलकर , महिला महाविद्यालय बल्लारपूर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य पटवर्धन यांनी केले. प्रस्ताविकामध्ये बालकांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी कोणती परिस्थिती असाव्यास पाहिजे हे सांगितले .कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन प्रा. शुभांगी भेंडे यांनी केले तर आभार प्रदर्शन कुमारी प्राची पिपरे यांनी केले. कार्यक्रमाला प्राध्यापक विनय कवाडे उपस्थित होते .कार्यक्रमात मोठ्या संख्येने मुलींची उपस्थिती होती.