रेणुका कॉलेज मध्ये “वाचन संकल्प महाराष्ट्राचा“ उत्सव साजरा .!

नागपुर (वि.प्र.) : रेणुका कॉलेज बेसा, नागपूर च्या  वतीने महाराष्ट्र शासन व उच्च तंत्र शिक्षण विभाग, नागपूर यांच्या सुचनेनुसार “वाचन संकल्प महाराष्ट्राचा“ व वाचन पंधरवाडा दि. 01.01.2025 ते 15.01 .2025 अनुषंगाने वाचनासंबंधी विविध प्रकारचे कार्यक्रम  घेवून विद्यार्थी, शिक्षक व वाचकांमध्ये वाचन जागृतता करण्यात आली. यामध्ये सामूहिक वाचन, ई-वाचन, लेखक विद्यार्थी संवाद, आरोग्य आणि वाचन मार्गदर्शन, ग्रंथालयाची सामाजिक भूमीका, मी असा घडलो, ग्रंथालयीन स्वच्छता, एक सेल्फी अभिमानाची, वाचन शपथ, ग्रंथ प्रदर्शन इ. असे विविध प्रकारचे कार्यक्रम घेण्यात आले. 
विशेष म्हणजे ग्रंथालयाच्या माध्यमातून वाचन संस्कृती रूजावी यासाठी कॉलेज ग्रंथालयाव्दारे नावीन्यपूर्ण उपक्रम राबवीले जातात . जसे थॉट ऑफ द डे, इव्हेन्ट ऑफ द डे, हॉस्पीटल लायब्ररी, वृद्धाश्रम ग्रंथालय, हेल्थ लायब्ररी, पब्लिक लायब्ररी, घडो विद्यार्थी, ग्रंथालयातून स्पर्धा परीक्षेकडे, एक विचार आपले जीवन बदलू शकतो, व्हावे त्यांच्या समान इ.
सत्र 2023-2024 मध्ये महाराष्ट्र शासन आयोजित व महानायक अमिताभ बच्चन ब्रॅंड अॅंबेसिडर असलेल्या महावाचन उत्सव रोज 10 मिनिटे काही चांगले नवीन वाचू या या संकल्पनेने प्रेरित होवून रेणुका कॉलेज ग्रंथालयाने रिड अॅण्ड ग्रो हा  उपक्रम  सुरू करून वाचनाला प्रोत्साहन देत आहेत. तसेच वाचन पंधरवाडा निमित्य 15 दिवस वाचना संबंधी  कार्यक्रम घेत सर्व वाचकांना वाचन करण्याची शपथ देत वाचनाचा प्रचार व प्रसार करीत वाचन उत्सव साजरा करण्यात आहे.
वरील “वाचन संकल्प महाराष्ट्राचा“ व वाचन पंधरवाडा दि. 01.01.2025 ते 15.01 .2025 च्या अनुषंगाने पंधरा दिवस  विविध कार्यक्रम घेण्यात आले. या  कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉं. अतुल महाजन, , ग्रंथपाल डॉं रमणिक  लेनगुरे तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व बहुसंख्येने विद्यार्थी व वाचक उपस्थित होते. या  कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक, शिक्षेकेत्तर कर्मचारी व ग्रंथालय विभागाव्दारे  भरपूर मेहनत घेण्यात आली.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.