भद्रावती (ता.प्र.) - येथील यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चीचोर्डी भद्रावती येथे भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिन "शिक्षक दिन "म्हणून साजरा करण्यात आला. "मानवी जीवनाला आकार देण्याचे काम शिक्षक करत असतात , आपण त्यांचा सन्मान केला पाहिजे " असे उद्गार अध्यक्ष डॉ. प्राचार्य जयंत वानखडे यांनी काढले.भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती द्वारा संचालित यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती येथे आज दिनांक 5 सप्टेंबर 2022 ला शिक्षक दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. जयंत वानखेडे तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. सुधीर मोते , प्राध्यापक शेखर जुमडे व्यासपीठावर उपस्थित होते. अध्यक्षीय मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉक्टर जयंत वानखेडे यांनी विद्यार्थीदशेतच नाही तर मानवी जीवनात गुरुचे स्थान महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. ज्ञानेश हटवार यांनी केले . कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. किशोर ढोक यांनी केले तर आभारप्रदर्शन प्रा.कमलाकर हवाईकर यांनी केले. कार्यक्रमाला विद्यार्थी ,शिक्षक ,प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
