भद्रावती (ता.प्र.) - स्थानिक विवेकानंद महाविद्यालयात नवप्रवेशित विद्यार्थी वर्गासाठी उद्बोधन वर्गाचे आयोजन करण्यात आले. प्राचार्य डॉ. नामदेव उमाटे अध्यक्षस्थानी असलेल्या या कार्यक्रमात महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना डॉ.ज्योती राखुंडे यांनी भारतातील उच्च शिक्षण व्यवस्था समजाऊन सांगितली.तसेच महाविद्यालयाचा उज्वल गौरवशाली इतिहास, संस्कृतीचा परिचय यावेळी विद्यार्थ्यांना करून दिला. याशिवाय सर्व प्राध्यापकांनी आपापल्या विभागांची ओळख विद्यार्थ्यांस करून दिली. प्राचार्य डॉ. उमाटे यांनी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाची शिस्त पाळण्याचे आणि महाविद्यालयातील सर्व सोईसुविधांचा लाभ करून घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. रमेश पारेलवार यांनी तर आभारप्रदर्शन डॉ.ज्योती राखुंडे यांनी केले.
