वाघाने बैलाचा घोट घेतला .!

 कोंढा येथील शेतकऱ्यात दहशत..!
भद्रावती (ता.प्र.) – तालुक्यातील कोंढा परिसरात एका वाघाचा धुमाकुळ सुरुच असुन या वाघाने कोंढा येथील एका शेतकऱ्याच्या बैलाला ठार मारल्याची घटना दिनांक २३ रोज बुधवारला उघडकीस आली. या घटनेमुळे कोंढा परिसरातील शेतकरी व गावकऱ्यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोंढा येथील शेतकरी रामदास महादेव गोरे यांचा बैल गावातील एका शेतशिवारात चरीत असतांना तेथे दबा धरुन बसलेल्या वाघाने त्याचेवर हल्ला करुन त्याला ठार मारले. यात या शेतकऱ्याचे नुकसान झाले. या घटनेची माहिती भद्रावती वनविभागाला दिल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी हरीदास शेंडे यांच्या नेतृत्वात वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले व घटनेचा पंचनामा केला. 
गेल्या काही दिवसांपासून हा वाघ या परिसरात दर्शन देत आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांची दिनचर्या बदलून गेली आहे. या वाघामुळे शेतिची कामे प्रभावित झाली तर वेकोली कामगार वाघाच्या भितीमुळे नेहमीचा रस्ता सोडून अन्य लांबच्या रस्त्याने ड्युटीवर जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.