गावात संविधान सभागृह उभारणे या मागणीसह OBC आरक्षण व OBC जातीनिहाय जनगणना संदर्भात वंचित तर्फे नवीन दहेली सरपंचाला निवेदन.!
बल्लारपूर (का.प्र.) - सुप्रीम कोर्टाने आर्थिक निकषावर उच्च वर्गातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना 10 % आरक्षण लागू करण्याचा निवाडा देवून सुप्रीम कोर्टाने 50 % पेक्षा जास्त आरक्षण देता येत नाही ही घातलेली अट शिथील केलेली आहे .याचाअर्थ आतापर्यंत विनाकारण OBC ना 52 % आरक्षणापासून वंचित ठेवून 27 % आरक्षणावरच समाधान मानावे लागले. एकंदरीत OBC ना घातलेली 27 % ची मर्यादा अन्यायकारक आहे.
त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाचा सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसूचित जाती व बौध्द घटकांचा वस्त्यांचा विकास करणे या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील सर्व समाज घटकापर्यंत बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पोहचवणे , शालेय विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण करणे यासाठी प्रत्येक गावात ग्रंथालय व अभ्यासिका यासारख्या अद्यावत सुविधांसह " संविधान सभागृह " सुरू करण्याची शासनाने मंजुरी प्रादान करण्यात आलेली आहे . सध्या गावात सभागृह, ग्रंथालय व अभ्यासिका यांची नितांत गरज आहे.
याकरिता वंचित बहुजन आघाडी बल्लारपूर तालुका - अध्यक्ष उमेश वाढई , सदस्य - संदिप निरंजने , विजय भोयर , अशोक मोरे, कोमल कुशवाह , अमिश मेश्राम, नितीन सोनटक्के , प्रदीप सोनटक्के , आकाश निरंजने यांनी वरील बाबीं लक्षात घेता केंद्र व राज्य शासनाने OBC ना 52 % आरक्षण लागू करावे व OBC ची जातीनिहाय जनगणना करावी तसेच गावात संविधान सभागृह उभारणे या संदर्भात ग्रामसभेत ठराव घेऊन शासन दरबारी पाठवण्याची मागणी नवीन दहेली सरपंच श्री. योगेशजी पोतराजे यांच्याकडे निवेनाद्वारे केलेली आहे.