विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ जिल्हा वर्धा चा विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे अधिकृत उमेदवार श्री. सुधाकर अडबाले सर यांचे प्रचारार्थ झंझावात प्रचार दौरा..!
बल्लारपूर (का.प्र.) - सोमवार दि. 28 नोव्हेंबर 2022 रोजी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ जिल्हा वर्धा चे वतीने विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे अधिकृत उमेदवार श्री. सुधाकर अडबाले सर यांचे प्रचारार्थ वर्धा शहरातील विविध शाळेत भेटी देण्यात आल्या त्यात प्रामुख्याने 1) यशवंत विद्यालय, येळाकेळी 2) अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांची शासकीय शाळा उमरी ( मेघे) 3) शासकीय आय. टी. आय. वर्धा 4) लोक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वर्धा 5) स्वावलंबी विद्यालय वर्धा 6) स्वावलंबी कन्या विद्यालय वर्धा 7) स्वावलंबी डी.एड. व बी. एड. कॉलेज वर्धा 8) मधुबन कॉन्व्हेन्ट वर्धा 9) कमला नेहरु विद्यालय वर्धा 10) केसरीमल कन्या विद्यालय वर्धा 11) मौलाना आझाद विद्यालय वर्धा 12) यशवंत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वायगाव इत्यादी शाळेत भेटी देण्यात आल्या. सदर भेटीत सर्व शाळांतील मतदार शिक्षक व शिक्षीका बंधू भगिनी यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला व शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी येत्या निवडणुकीत विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे अधिकृत उमेदवार श्री. सुधाकर अडबाले सर यांनाच पसंती क्रमांक एक (1) चे मतदान करून भरघोस मतांनी निवडून आणण्याची हमी दिली. सदर प्रचार दौऱ्यात विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह व अधिकृत उमेदवार श्री. सुधाकर अडबाले सर, विमाशी चे जिल्हाध्यक्ष श्री. राजू चंदनखेडे, कार्याध्यक्ष श्री. पांडुरंगजी भालशंकर, मार्गदर्शक श्री. विष्णू इटनकर, कार्यवाह श्री. महेन्द्र सालंकार, सहकार्यवाह श्री. प्रविण देशमुख, मार्गदर्शक श्री. सुनील दुम्पलवार, श्री. अशोक घारे व श्री. संजय बामनपल्लिवार आदी पदाधिकारी , सदस्य, मार्गदर्शक व कार्यकर्ते उपस्थित होते.
आपली विमाशी - नातं विश्वासाचं संकल्प शिक्षक सेवेचा, जय विमाशी . . कहो दिल से विमाशी फिर से.!