देवानंद मेश्राम यांनी केला जागतिक विक्रम.!


भद्रावतीचे सुपुत्र यांचे वर्ल्ड अल्ट्रा सायकलींग रेकार्ड मध्ये होणार नोंद.!
भद्रावती (ता.प्र.) - भद्रावतीचे सुपुत्र माजी नौसैनिक आणि वरूड तालुक्यात सद्या कार्यरत तलाठी देवानंद मेश्राम यांनी काश्मीर श्रीनगर ते कन्याकुमारी ३६२६ कि.मी. सायकल प्रवास सरासरी ३२५ किमी रोज प्रमाणे १३ राज्यामधुन ११ दिवस १२ तास १० मिनीटात पुर्ण करून आणखी एक विक्रम आपल्या नावे केलेल आहे. ५० ते ६० वर्षे या वयोगटामधून हा प्रवास पूर्ण करणारे हे पहिले व्यक्ती ठरले त्यामुळे त्यांच्या या विक्रमाची वर्ल्ड अल्ट्रा सायकलींग रेकॉर्डमध्ये नोंद होणार आहे.
सायकल स्वार ग्रृपच्या माध्यमातुन देवानंद मेश्राम यांनी अनेक ब्रेव्हेट जिंकल्या आहेत. हजारो किमी सायकलींग करून विक्रम करणारे देवानंद यांनी प्रदुषणमुक्त भारत हा संदेश देवून सायकलींगचे महत्व पटवून दिले आहे.
पहिल्या दिवशी नऊ ऑक्टोबरला कश्मीर-पठाणकोट-होशियारपूर मार्गे कुरुक्षेत्र असा ३०३ किलोमीटर तर दुसऱ्या दिवशी १० ऑक्टोबरला पठाणकोट मधून सायकल प्रवास सुरू होऊन कुरुक्षेत्र पर्यंत ३३२ किलोमीटर आणि ११ ऑक्टोंबर ला कुरुक्षेत्र ते झाशी जवळ ३१२ किलोमीटर असे तीन दिवसात ९४७ किलोमीटर अंतर सायकलने पूर्ण केले. १२ ऑक्टोबर ला झाशी ते काटंजी ३१४ किमी, काटंजी ते नागपूर पर्यंत ६०७ किमी चा प्रवास पार केला. समोर नागपूर ते आर्मूल ३१४ किमी,आर्मूल ते जडचेरला २६३ किमी , जडचेरला ते मेहबूब नगर २७४ किमी चा प्रवास पूर्ण करून समोर मेहबुब नगर ते हसुर २४९ किमी, हसुर ते वेदासंदूर ३०८ किमी व वेदासंदुर ते कन्याकुमारी ३१३ किमी चा हा शेवटचा टप्पा करून जागतिक विक्रम आपल्या नावी नोंदविला. 
देवानंद मेश्राम मूळचे चंद्रपूर जिल्ह्याचे भद्रावती सुमठाना रहिवाशी असून त्यांनी आपले शालेय शिक्षण १२ वी पर्यंतचे केंद्रीय विद्यालय व आयुध निर्माण हायस्कुल येथे ईथुन पुर्ण केले व देशसेवेकरीता नौदलात भरती झालेत. आपली देशसेवा पुर्ण करून सेवानिवृत्ती नंतर सध्या वरुड तालुक्यामध्ये तलाठी या पदावर कार्यरत असून त्यांनी हा नवा जागतीक विक्रम केला.
देवानंदने आपल्या ह्या जागतिक विक्रमाच्या यश हे नागपूर येथील डॉ. अमित समर्थ यांच्या प्रशिक्षणा मुळे साध्य झालेत अस ही नमूद केले.
भद्रावती आयुध निर्माणी येथील शाळेतील मित्र गीता पाटील, रघू चेपूरवार, आशिष सिंह, सुब्रत हल्दार, कावडकर मॅडम तसेच ईतर मित्र व शिक्षकवृंदानी आर्थीक सहकार्य केले. धीरज महाडिक , राजेश लोंढे, आकाश मल्लिक, दिनेश धुर्वे, ज्ञानेश्वर राऊत, विशाल वानखडे व सारंग वाघमारे क्रू मेम्बर यांनी विशेष मेहनत व सहकार्याने घेतले.
त्यांच्या या उपक्रमाला महसूल विभागातील सर्व अधिकारी, सहकारी मित्र त्यांना नेहमी सहकार्य करतात. जागतिक विक्रमाचे श्रेय देवानंद यांनी आपल्या कुटुंब आई वडील, तसेच आयुध निर्माणी हायस्कुल मित्र रघू चेपूरवार, विनोद वर्मा, माधुरी रंभाड व ईतर, सायकल स्वार  ग्रुप व भद्रावती तसेच वरूड तालुक्यातील सर्व जनतेला देत आहे, जे नेहमी त्यांच्या उपक्रमा मध्ये सहकार्य करतात असे नमूद केले.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.