बुद्धिबळ स्पर्धेत प्रिन्सेस दासरीची विभागावर झेप..!

भद्रावती (ता.प्र.) - जिल्हा क्रीडा स्टेडियम चंद्रपूर येथे झालेल्या जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती ची खेळाडू प्रिन्सेस दासरी हिने जिल्हावर प्राविण्य प्राप्त केले. जिल्हा जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत प्रथम येत विभागीय स्पर्धेसाठी तिची निवड झालेली आहे . बुद्धिबळ स्पर्धेत जिल्हा वर प्राविण्य प्राप्त करून विभागावर निवड झाल्याबद्दल तीचे सर्वत्र कौतुक होत आहे. 
भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती चे अध्यक्ष डॉ. विवेक शिंदे, सचिव डॉ. कार्तिक शिंदे, सहसचिव डॉ. विशाल शिंदे , प्राचार्य डॉ जयंत वानखेडे, डॉ. ज्ञानेश हटवार, क्रिडा शिक्षक रमेश चव्हाण, शेखर जुमडे, अतुल गुंडावार, किशोर चौधरी, डॉ. सुधीर मोते , शुभम सोयाम व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व विभागीय क्रिडा स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. तीच्या यशाबद्दल तीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.