भद्रावती (ता. प्र.) - खेलो इंडिया युथ गेम्स च्या राज्यस्तरीय निवड चाचणी करिता यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती येथील विद्यार्थिनी कुमारी वैष्णवी बालाजी मेश्राम वर्ग अकरावा कला हिची निवड झालेली आहे .
खेलो इंडिया युथ गेम्स मध्य प्रदेश 2022 साठी राज्यस्तरीय निवड चाचणी करिता यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालय भद्रावतीची विद्यार्थिनी कुमारी वैष्णवी बालाजी मेश्राम हिची कबड्डी या खेळासाठी राज्यस्तरीय निवड चाचणी करिता निवड झालेली आहे. दिनांक दोन-तीन जानेवारी 2023 ला श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल सातारा येथे राज्यस्तरीय निवड चाचणी होणार आहे.
या निवड चाचणीत चंद्रपूर जिल्ह्यातील यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती येथील कुमारी वैष्णवी मेश्राम हिची एकमेव निवड झालेली आहे . या निवड चाचणीत यशस्वी झालेल्या खेळाडूंना राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी खेळण्याची संधी मिळणार आहे.
खेलो इंडिया राज्यस्तरीय निवड चाचणी करिता कुमारी वैष्णवी मेश्राम हिची निवड झाल्याबद्दल भद्रावती शिक्षण संस्था भद्रावतीचे अध्यक्ष डॉ. विवेक शिंदे, सचिव डॉ. कार्तिक शिंदे, सहसचिव डॉ. विशाल शिंदे, यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयंत वानखेडे, क्रीडा शिक्षक प्राध्यापक रमेश चव्हाण, किशोर ढोक, माधव केंद्रे, डॉ. ज्ञानेश हटवार, शुभम सोयाम, समस्त प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी तिचे अभिनंदन केले आहे. व राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड व्हावी अशा प्रकारच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
"शेंगदाणा पापडीत आढळल्या अळ्या .. कंपनीचा परवाना रद्द करण्याची मागणी .!"
भद्रावती येथून जवळच असलेल्या मांगली (रै.) येथील एका किराणा दुकानात शेंगदाणा पापडीमध्ये अळ्या आढळून आल्याने कंपनीचा परवाना रद्द करण्याची मागणी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सूरज चौधरी यांनी केली आहे.
मांगली (रै.) येथील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सूरज चौधरी हे गावातील पिंपळकर यांच्या किराणा दुकानांमध्ये गेले व त्यांनी दोन श्री जी चिकि अँड स्नॅक्स कंपनीची शेंगदाणा पापडी घेतली. त्या शेंगदाणा पापडीची शेवटची तारीख (एक्सपायरी डेट) जानेवारी २०२३असताना सुद्धा शेंगदाणा पापडीमध्ये अळी आढळून आली. त्यामुळे ही कंपनी जनतेच्या जीवाशी खेळ करत असल्याचा आरोप करत कंपनीच्या ग्राहक तक्रार नंबरवर फोन केला व सदर प्रकार त्यांना संगीतला. परंतु कंपनी कडून उडवाउडवीचे उत्तर मिळाल्यामुळे सुरज चौधरी यांनी थेट कंपनी विरोधात अन्न सुरक्षा विभागाकडे ऑनलाइन पद्धतीने तक्रार केली असून सदर कंपनीचा परवाना रद्द करून कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. खाद्य पदार्थांच्या नावावर नागरिकांच्या आरोग्याशी खेळला जाणारा खेळ खपवून घेतला जाणार नाही.