बामणी (दुधोली) उपसरपंच पदावर सुभाष ताजनेची निवड.!

ग्रामपंचायतचा कारभार अपक्षांच्या हाती .. सरपंच प्रल्हाद आलाम यांच्या अध्यक्षतेखाली झाली निवडणूक ..!
बल्लारपुर (का.प्र.) - बल्लारपूर शहराला लागून असलेल्या बामणी ( दुधोली ) ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक नुकतीच झाली. येथे सरपंच पदाच्या थेट निवडणुकीत अपक्ष उमेदवार प्रल्हाद बुधाजी आलाम यांनी भाजपा व काँग्रेस उमेदवारांचा पराभव करून विजय प्राप्त केला. बुधवारी दुपारी २ वाजता उपसरपंच पदासाठी ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक पार पडली. यामध्ये अपक्ष आघाडीचे सुभाष ताजने यांनी उपसरपंच म्हणून प्रतिस्पर्धी उमेदवाराचा पराभव करून विजय मिळवला. बामणी ( दुधोली ) ग्रामपंचायत अपक्षांच्या हातात गेली आहे.
बामणी ( दुधोली ) ग्रामपंचायत उपसरपंच पदाच्या निवडीसाठी विशेष सभा आज बुधवारी घेण्यात आली. सरपंच प्रल्हाद आलाम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सभेत उपसरपंच पदासाठी अपक्ष आघाडीचे सुभाष ताजने व भाजपाच्या आघाडीच्या सरला दिपक जुआरे यांनी नामांकन दाखल केले.या ग्रामपंचायत मध्ये सार्वत्रिक निवडणुकीत सुभाष ताजने यांच्या अपक्ष आघाडीचे ७, भाजपा आघाडीचे ४ तर काँग्रेस आघाडीचे २ असे ग्रामपंचायत सदस्य निवडून आले होते. यावेळी सरपंच यांना उपसरपंच पदाच्या निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार देण्यात आला. यामुळे उपसरपंच पदाची निवडणूक चूरशीची होणार म्हणून गावाकऱ्यात चर्चा होती. मात्र सुभाष ताजने यांनी राजकीय कौशल्य व मुत्सद्धीपणाच्या बळावर उपसरपंच पद प्राप्त केले.
येथील उपसरपंच पदाच्या निवडणुकीत सुभाष ताजने यांना ८ मते तर त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार सरला जुआरे यांना ४ मते मिळाली. या निवडणुकीत २ मते अवैध ठरली. यावेळी सहायक निवडणूक अधिकारी म्हणून नायब तहसीलदार राजेंद्र शेंडे व ग्रामविकास अधिकारी लक्ष्मण शेंडे यांनी काम पाहिले. उपसरपंच पदी सुभाष ताजने यांची निवड होताच गावाकऱ्यांनी व हितचिंतकांनी फटाक्याची आतषबाजी करून जल्लोष साजरा केला.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.