भद्रावती (ता.प्र.) - जागतिक बँक सहाय्यित मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प अंतर्गत उपप्रकल्प स्मार्ट कॉटन, महाकॉट योजनेंतर्गत एक गाव एक वाण या धर्तीवर एकजिनसी कापुस उत्पादन करून स्वच्छ कापुस निर्मिती करण्या करिता तालुका कृषि अधिकारी कार्यालय भद्रावती मार्फत उपक्रम राबविण्यात येत आहे. तालुक्यातील चौदा गावांचा यात सहभाग आहे. दिनांक 10 जानेवारी 2023 रोजी मौजा चालबर्डी (कोंढा) येथील जय किसान शेतकरी पुरुष बचत गट च्या शेतकरी सदस्यांनी अदिती कॉटन इंडस्ट्रीज टाकळी येथे जिनिंग प्रोसेसिंग करिता कापुस संकलनाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी कृषि उपसंचालक, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय चंद्रपूर चे आर. जे. मनोहरे यांचे हस्ते उदघाटन करण्यात आले.
पहिल्या दोन वेचण्याच्या स्वच्छ कापसाचे संकलन करून त्यावर जिनिंग प्रेसिंग करून गाठी तयार करण्यात येऊन या तयार करण्यात आलेल्या गाठी ऑनलाईन प्रणालीद्वारे आंतरराष्ट्रीय बाजारात विक्रीस ठेवण्यात येणार आहे. शेतकरी स्वतःच्या कापसाचे मूल्यवर्धन करून आंतरराष्ट्रीय बाजारात उतरून विक्री करण्याची संधी या स्मार्ट कॉटन महाकॉट उपप्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उपलब्ध झाली आहे. तालुका कृषि अधिकारी भद्रावती यांनी राबविलेल्या या उपप्रकल्पामुळे शेतकऱ्यांना स्वच्छ उत्कृष्ट प्रतीचा कापुस गाठी उत्पादीत करून स्वतः आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विकण्याची संधी उपलब्ध होत आहे.
यावेळी उपविभागीय कृषि अधिकारी वरोरा चंद्रकांत ठाकरे, तालुका कृषि अधिकारी भद्रावती कु. मोहिनी जाधव, मंडळ कृषि अधिकारी भद्रावती, ए. व्हि. भरडे, मंडळ कृषि अधिकारी चंदनखेडा, व्हि. जे. चवले, कृषि अधिकारी भद्रावती, यु बी झाडे, मल्टीटास्किंग ग्रेडर पी एम ठेंगणे, गिरीश भोंबे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव एन एन पुनवटकर, अदिती जिनिंगचे सुभाष बाहे, दिपक गौरकर, श्रीकांत चौधरी, कृषि पर्यवेक्षक विजय कवाडे, सौ. एम. एन. ताजने, आत्मा योजनेचे सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक सुधीर हिवसे, गटप्रवर्तक किशोर उपरे, यांचे सह जय किसान शेतकरी पुरुष बचत गट चालबर्डी (कोंढा) चे सर्व शेतकरी सदस्य व तालुक्यातील शेतकरी संदिप एकरे, नरेंद्र जिवतोडे, सुधाकर जिवतोडे, केशव ढेंगळे, विलास सातपुते, सुनील तेलंग, धनराज आसेकर, प्रकाश उमरे, महेश झाडे, पंढरी नागपुरे, संजय किन्हाके, हेमंत बोबडे, आनंदराव देहारकर, आशिष एकरे व परिसरातील शेतकरी बांधव व कृषि विभागाचे क्षेत्रीय कर्मचारी उपस्थित होते.