बल्लारपूर (का.प्र.) - संत तुकाराम महाराज सेवा मंडळ बल्लारपूर - बामणी व बल्लारपूर तालुका शिक्षक संघटना यांच्या वतीने सोमवार दिनांक २० फेब्रुवारी ला सायं. ६ वाजता संत तुकाराम महाराज जयंती छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने सामाजिक प्रबोधन व मान्यवरांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमात मा.गणेश हलकारे सुप्रसिद्ध व्याख्याते, अमरावती यांचे संत तुकाराम व छत्रपती शिवराय यांचे सामाजिक कार्य व आजच्या युवकांची जबाबदारी या विषयावर जाहीर व्याख्यान असुन नवनिर्वाचित शिक्षक आमदार मा. सुधाकरराव अडबाले यांचा जाहीर सत्कार आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यमाचे अध्यक्षस्थानी संत तुकाराम सेवा मंडळाचे अध्यक्ष मा. पांडूरंगजी जरिले राहणार आहे. तसेच प्रमुख पाहुणे श्री.गुलाबराव बोढे, डॉ रजनीताई हजारे, प्रा.नामदेवजी गोवारदिपे, प्रा.एल. के. बल्की , श्री बापुरावजी वैद्य, श्री मुरलीधर झाडे, प्रा. एन. के. लिंगे, श्री कुर्मदासजी काळे, श्री उध्दवराव धोटे, अँड पुरुषोत्तम सातपुते, श्री मनोहरजी पिंपळकर व श्री मनोहरजी पिंपळकर राहणार आहेत. सर्व जनतेस या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे.
संत तुकाराम व छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त सामाजिक प्रबोधन कार्यक्रम .!
byChandikaexpress
-
0