भद्रावती (ता.प्र.) - वर्धा येथे झालेल्या विभाग स्तरीय तायकांदो स्पर्धेत यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालयातील दोन खेळाडूंची राज्यस्तरावर निवड झाली आहे.शालेय क्रीडा विभागामार्फत झालेल्या विभाग स्तरीय तायकांदो स्पर्धेसाठी चंद्रपूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व कार्तिक केमस्कर व रोशनी चतारे यांनी वर्धा येथे झालेल्या विभागीय स्तरावर केले आहे. या स्पर्धेमध्ये विभागीय स्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त केला व राज्यस्तरावर ते नागपूर विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहे .
सतरा वर्षाखालील वयोगटात कार्तिक खेमस्कर या विद्यार्थ्याने 48 ते 51 गटात विभागावर प्रथम क्रमांक प्राप्त केला व राज्यस्तरावर होणाऱ्या स्पर्धेत त्याची निवड झाली आहे. रोशनी चतारे या विद्यार्थिनीने 19 वर्षाखालील वयोगटात 42 किलो वजन गटात विभागीय स्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त केला व राज्यस्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी ती नागपूर विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहे.
तायकांदो स्पर्धेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्याची राज्यस्तरावर निवड झाल्याबद्दल भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती चे अध्यक्ष डॉ. विवेक शिंदे, सचिव डॉ. कार्तिक शिंदे , सहसचिव डॉ. विशाल शिंदे , प्राचार्य डॉ. जयंत वानखेडे, प्राचार्य महादेव बरडे , क्रीडा शिक्षक रमेश चव्हाण, तायकांदो कोच सतीश खेमस्कर, डॉ. ज्ञानेश हटवार, किशोर ढोक, माधव केंद्रे , मनोज बांदुरकर समस्त प्राध्यापक, शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. राज्यस्तरावर निवड झाल्याबद्दल सर्वत्र त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.